मिनी सीशोर परिसरात डेब्रिजचा भराव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 01:44 AM2018-08-23T01:44:55+5:302018-08-23T01:45:06+5:30
त्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींकडून गोण्यात भरून डेब्रिज त्याठिकाणी टाकण्यात आले आहे
नवी मुंबई : वाशीतील मिनी सीशोर परिसरातील जॉगिंग ट्रॅकभोवती डेब्रिजचे ढीग साचले आहेत. रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींकडून गोण्यात भरून हे डेब्रिज त्याठिकाणी टाकण्यात आले आहे. यामुळे सकाळ, संध्याकाळ त्याठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल म्हणून ओळखल्या जाणाºया शहराला डेब्रिजचा विळखा बसत चालला आहे. मोकळ्या मैदानात, रस्त्यालगत तसेच उद्यानांमध्येही रात्री अपरात्री डेब्रिज टाकले जात आहे. यामुळे पालिकेच्या विभाग कार्यालयाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र अधिकाºयांच्या उदासीनतेचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाशीतील मिनी सीशोर परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आले आहे. त्याठिकाणी देखील गोणीत भरून आणलेले डेब्रिज टाकले जात आहे. सदर परिसरात सीसीटीव्ही व सुरक्षारक्षक असतानाही हा प्रकार सुरू आहे. यामुळे डेब्रिजमाफियांनी पालिकेची यंत्रणा देखील मुठीत घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे.