शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

घर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 1:41 AM

कळंबोलीमधील घटना : ज्येष्ठ नागरिकाचे २१ लाख हडपले

पनवेल : विमा पॉलिसीच्या मोबदल्यात घर देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोलीमध्ये उघडकीस आला आहे. तब्बल २१ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयसिंग बाबुसिंग जमादार हे ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी भारती आस्का, बिरला सनलाइफ, एचडीएफसी, आयसीआयसीआय, मॅक्स या कंपनीच्या त्यांच्या व मुलाच्या नावे एक रकमी प्रीमियम भरून पॉलिसी काढल्या होत्या. या पॉलिसीच्या आधारे त्यांना प्राची शर्मा (रा. दिल्ली) या महिलेने संपर्क साधला व जमादार हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे टू बीएचके चा एक रूम मिळेल व त्यांचा मुलगा सचिन जमादार यास वन बीएचके रूम मिळेल, असे प्रलोभन दाखवले. या वेळी जमादार यांनी असे कोणी घर देत नाही, असे शर्मा यांना सांगितले.

मात्र, शर्मा यांनी पॉलिसी कंपनीकडे एकरकमी जास्त पैसे जमा झाल्यानंतर आमची कंपनी अशा वेळेस मोठ्या बिल्डरांशी संपर्क करून कमी किमतीत सदनिका विकत घेत असते, असे सांगून प्रथम प्लॉटची रक्कम रुपये दीड लाखाची मागणी केली. जमादार यांनी महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रक्कम दीड लाख रुपये एनईएफटी द्वारे पाठवले. त्यानंतर पुन्हा वर्मा यांनी जमादार याना संपर्क करून परत दुसºया घरासाठी दीड लाख मागणी केली. त्यानुसार एनईएफटीद्वारे दीड लाख रुपये जमा केले. त्यानंतर काही दिवसांनी प्रियंका चौधरी यांनी मोबाइलवरून फोन करून प्राची शर्मा यांना कंपनीने नोकरीतून काढून टाकले आहे, असे सांगितले. तुम्ही या पुढे माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याशी संपर्कात राहा, असे सांगितले.

या वेळी प्रियंका चौधरी हिने तिच्यासोबत काम करणाºया शोभा श्रीवास्तव, रेणुका वर्मा, वैशाली सक्सेना, प्रिया सक्सेना, जितकौर या बँकेत वेगवेगळ्या पदावर काम करीत असून, यापैकी कोणी फोन करून माहिती विचारली तरच त्यांना माहिती द्या, असे सांगितले.त्यानंतर प्रियंका चौधरी या महिलेने जमादार यांच्याशी पुन्हा संपर्क साधून वेगवेगळी कारणे सांगून जमादार यांच्याकडून पैशांची मागणी केली. त्यानुसार जमादार यांनी २१ लाख ४२ हजार २९३ रु पये त्यांना दिले; परंतु प्रत्यक्षात त्यांना घरांचा ताबा दिला नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास येताच संबंधितांविरोधात खारघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून फसवणूक करणाºया टोळीचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई