मनपा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वेळा निश्चित, पनवेलकरांनी व्यक्त केले समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 04:27 AM2019-07-04T04:27:07+5:302019-07-04T04:27:19+5:30
पनवेल महानगर पालिकेत विविध विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना भेटण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
पनवेल : पनवेल महानगर पालिकेत विविध विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना भेटण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामुळे या निश्चित वेळेतच पालिकेतील अधिकाºयांना भेटता येणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
विविध विभागातील अधिकाºयांना कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण करण्याबरोबर कार्यालयीन बाहेरील कामांची देखील पाहणी करण्याची जबाबदारी अधिकाºयांवर असते. अशा वेळेत कार्यालयात अधिकाºयांना भेटण्यासाठी येणाºया नागरिकांची मोठी गैरसोय होते. तासनतास वाट पाहून देखील अधिकाºयांची भेट होत नसल्याने पालिकेत येणाºया नागरिकांचा हिरमोड होत असतो. याकरिता पालिकेने वेळा निश्चित केल्या आहेत. यामध्ये पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, नगररचना संचालक अ. अ. शेख, शहर अभियंता सुधीर कटेकर यांच्यासह मुख्य लेखा अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांना दररोज दुपारी अडीच ते साडेतीन या एक तासात भेटता येणार आहे. तर दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना भेटण्यासाठी सर्वाधिक वेळ देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना भेटण्यासाठी सुरुवातीपासूनच वेळ ठरविलेली आहे. आता आयुक्तांना भेटण्यासाठी नवी वेळ ठरविण्यात आली असून सोमवार व गुरुवार याच दिवशी सायंकाळी ४ ते ५ या एक तासांत भेट घेता येणार आहे.