नोटाबंदीचा निर्णय म्हणजे आर्थिक आणीबाणी - लाड

By admin | Published: January 11, 2017 06:14 AM2017-01-11T06:14:38+5:302017-01-11T06:14:38+5:30

सरकारचा हा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे सर्वसामान्यांसाठी आणीबाणीचा ठरला असल्याची जोरदार टीका आमदार सुरेश लाड यांनी केली.

The decision to annulment is a financial emergency | नोटाबंदीचा निर्णय म्हणजे आर्थिक आणीबाणी - लाड

नोटाबंदीचा निर्णय म्हणजे आर्थिक आणीबाणी - लाड

Next

कर्जत : सरकारचा हा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे सर्वसामान्यांसाठी आणीबाणीचा ठरला असल्याची जोरदार टीका आमदार सुरेश लाड यांनी केली. कर्जत राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या नोटाबंदीच्या निषेध मोर्चात लाड बोलत होते.
सोमवारी सकाळी टिळक चौकातून बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचला. तेथे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांकडून मोर्चा रोखण्यात आला. या वेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. आमदार सुरेश लाड यांनी उपस्थित मोर्चेकऱ्यांना संबोधित करत, शेतजमिनीतून जाणारी रिलायन्स पाइपलाइन संबंधित अहवाल १७ जानेवारीला सादर होणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी भूमिका स्पष्ट करेल. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी एकदा नाही, तर अनेक वेळा मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे, असेही नमूद केले. यावेळी जि प. अध्यक्ष सुरेश टोकरे आदी उपस्थित होत्या.

नोटाबंदी विरोधात तहसीलदारांना निवेदन
च्म्हसळा : केंद्र सरकारने केलेल्या हजार-पाचशे रु पयांच्या नोटाबंदी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने म्हसळ्यात तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. अलीशेट कौचाली म्हणाले की, ‘नोटाबंदी विरोधात जनतेचा आक्र ोश आहे. सरकारने पूर्वतयारी न करताच नोटाबंदी केली. यामुळे देशात अराजकता निर्माण झाली आहे. नागरिकांना बँकांच्या समोर उभे राहावे लागत आहे. त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन तीव्र करणार आहे. या वेळी सभापती महादेव पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: The decision to annulment is a financial emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.