शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

महिला मतदारांचा टक्का वाढल्याने ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:29 AM

मावळ मतदारसंघात २००९च्या तुलनेत २०१४ मध्ये १४.५ टक्के जास्त महिलांनी केले होते मतदान

- नारायण बडगुजरपिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. २००९ मध्ये ४६.९८, तर २०१४ मध्ये ४६.९७ टक्के महिला मतदार होत्या. २०१९ मध्ये म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ४७.६४ महिला मतदार आहेत. अर्थात गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यंदा मावळ मतदारसंघातील महिलांचा टक्का वाढला आहे.मावळ मतदारसंघात २००९ मध्ये १६,०४,८८६ मतदार होते. त्यात ७,५३,९१४ महिला, तर ८,५०,९७२ पुरुष मतदार होते. २०१४ मध्ये १९,५३,७४१ मतदार होते. त्यात ९,१७,७७० महिला तर १०,३५,९६१ पुरुष मतदार होते. यंदा २२,२७,७३३ मतदार असून, यात १०,६१,३१३ महिला, तर ११,६५,७८८ पुरुष मतदार आहेत. तसेच ३२ तृतीयपंथी तर ६०० सर्व्हिस अर्थात पोस्टल मतदार आहेत.0% तृतीयपंथी मतदारांची नोंद २०१४ पासून करण्यात आली. त्यामुळे २००९ मध्ये मतदारयादीत तृतीयपंथी मतदाराची नोंद नव्हती.1% २०१४ मध्ये मावळ मतदार संघात १० तृतीयपंथी मतदार होते. यातील एकाच मतदाराने मतदान केल्याने त्यांची टक्केवारी एक होती.1% महिला मतदारांचा टक्का गेल्या निवडणुकीत किंचित घटला होता. मात्र २००९ आणि २०१४ च्या तुलनेत यंदा महिला मतदारांची संख्या एका टक्क्याने वाढली आहे. तसेच तृतीयपंथी मतदार वाढले असून पुरुष मतदारांचा टक्का घटला.लोकसभेच्या २००९ मधील निवडणुकीत ४२.९६ टक्के महिलांनी मतदान केले होते. मात्र २०१४ मधील निवडणुकीत ५७.४६ टक्के महिलांनी मतदान केले होते. अर्थात २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये १४.५ टक्के जास्त महिलांनी मतदान केले होते. यंदा महिला मतदारांचा टक्का वाढला असल्याने अर्धी खुर्ची नारीशक्तीच्या हाती आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Navi Mumbaiनवी मुंबई