जेएनपीटीतील व्यापारात घट

By admin | Published: August 4, 2015 03:00 AM2015-08-04T03:00:43+5:302015-08-04T03:00:43+5:30

जीटीआय बंदराविरोधात कामगारांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे जेएनपीटी आणि डीपी वर्ल्ड या दोन्ही बंदरावरच्या व्यापारावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे

Decrease in trade in JNPT | जेएनपीटीतील व्यापारात घट

जेएनपीटीतील व्यापारात घट

Next

उरण : जीटीआय बंदराविरोधात कामगारांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे जेएनपीटी आणि डीपी वर्ल्ड या दोन्ही बंदरावरच्या व्यापारावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. बंदरातून कंटेनर आयात-निर्यातीची क्षमता घटल्याने कामगार आणि जीटीआय व्यवस्थापन या दोघांनी चर्चा करून तोडगा काढावा, अशी सूचना जेएनपीटी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी केली आहे.
जेएनपीटीच्या माध्यमातून सोमवारी सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि जीटीआय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली. तिन्ही बंदरावर होणाऱ्या आर्थिक नुकसानाची दखल घेत शुक्रवारपर्यंत बैठक घेऊन सामोपचाराने प्रश्न सोडविण्याचे आवाहनही बन्सल यांनी बैठकीतून केले.
जीटीआय व्यवस्थापनाने नऊ वर्षांपासून काम करणाऱ्या १९४ कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेण्याचा आणि महेश इंटरप्रायझेस कंपनीचा कामाचा ठेका रद्द करण्याचा निर्णय सात दिवसांत घेतला नाही तर बंदराचे कामकाज बंद पाडण्याचा निर्वाणीचा इशारा सर्वपक्षीय
संघर्ष समितीने शनिवारी दिला. कामगारांनी आंदोलनाचा एक भाग म्हणून जीटीआय बंदरात सुरू केलेल्या स्लोडाऊन आंदोलनाचा जीटीआय बंदराबरोबरच जेएनपीटी आणि डीपी वर्ल्ड या दोन्ही बंदरावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.
जेएनपीटीच्या प्रशासन भवनात आयोजित बैठकीस माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. मनोहर भोईर, माजी आ. विवेक पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख दिनेश पाटील, जे. एम. म्हात्रे, संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल पाटील, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, उरण संघर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस प्रशांत पाटील, महिला तालुका अध्यक्षा भावना घाणेकर, शेकाप चिटणीस महादेव घरत, जीटीआय बंदराचे सीईओ रवी गायतोंडे, राजेश सिंग आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत संघर्ष समिती आणि जीटीआय अधिकारी यांच्यात कामगारांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा झाली.
वारंवार आश्वासने देऊन कामगारांची फसवणूक करणाऱ्या जीटीआय व्यवस्थापनावर विश्वास राहिला नसल्याचेही संघर्ष समितीने या वेळी स्पष्ट केले. (वार्ताहर)

Web Title: Decrease in trade in JNPT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.