शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

पदवीधर मतदारसंघातील मतदार संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 1:39 AM

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक रंगात आली असताना आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूकदेखील तोंडावर आली

वैभव गायकरपनवेल : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक रंगात आली असताना आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूकदेखील तोंडावर आली आहे. ही निवडणूक येत्या २५ जून रोजी होणार आहे. मात्र, या निवडणुकीबाबत तसेच मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांसह राजकीय पक्ष देखील उदासीन असल्याचे दिसून येत आहे.शिवसेना, भाजपा,शेकाप आघाडी अशी तिरंगी लढत या निवडणुकीत पहावयास मिळणार आहे. या निवडणुकीत मतदारांची घट हा चिंतेचा विषय बनला आहे. मतदार नोंदणीमध्ये राजकीय पक्षाच्या उदासीनतेमुळे मतदारांमध्ये फारशी वाढ झाली नाही. उलट गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा २0 हजार मतदार घटले आहेत. पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकण पदवीधर मतदारसंघात येतात. २0१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात १ लाख ९ हजार मतदार नोंदणी झाली होती. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ९0 हजार २५२ इतकी मतदार नोंदणी झाली आहे. त्यामुळे सुमारे २0 हजारांनी पदवीधर मतदार संख्या घटली आहे. पदवीधर मतदारांमध्ये असलेल्या मतदानाविषयी निरुत्साह या माध्यमातून स्पष्ट झाला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ १९८८ मध्ये अस्तित्वात आला. यावेळी केवळ ६ हजार मतदार नोंदणी झाली होती. त्यावेळी ठाणे येथील भाजपाचे उमेदवार वसंत पटवर्धन विजयी झाले होते. १९९४ मध्ये या मतदारसंघात १२ हजार मतदार नोंदणी झाली. मतदार दुप्पट वाढले. त्यावेळी डॉ. अशोक मोडक आमदार म्हणून निवडून आले. २00६ साली तब्बल ६६ हजार मतदार नोंदणी झाली. त्यावेळी भाजपाचे संजय केळकर यांनी राष्ट्रवादीचे नीलेश चव्हाण यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव केला होता तर २0१२ मध्ये पदवीधर मतदार वाढले त्यासाठी राष्ट्रवादीने जोर लावला आणि मतदार संख्या १ लाख ९ हजारांवर गेली. यावेळी राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांना २७,६३३ तर भाजपाचे संजय केळकर यांना २२ हजार ९२ मते मिळाली आणि डावखरे ५६४१ मतांनी विजयी झाले. पारंपरिक भाजपाकडे असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून आणला होता. आता २५ जून रोजी याच मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामुळे सत्तेत असलेलीभाजपा पुन्हा एकदा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरेंना आपल्या गळाला लावत त्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला आहे. त्यामुळे भाजपा या मतदार संघाकरिता आपली ताकद पणाला लावणार आहे हे निश्चित झाले आहे. नुकतीच कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी आपल्या मुलाला निवडणुकीत उतरविले होते. शेकापने यावेळी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. अनिकेत तटकरे हे या मतदारसंघातून एकतर्फी विजयी झाले.यामुळे एक पाऊल मागे घेत राष्ट्रवादी ही जागा शेकापला सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे .कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील पालघर जिल्ह्यात १५१३५, ठाणे जिल्ह्यात ३७,२५४, रायगड जिल्ह्यात २४१५८ , रत्नागिरी जिल्ह्यात १५,५0७, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५८७ पदवीधर मतदार नोंदणी झाली आहे. ही निवडणूक २५ जून रोजी होणार असून निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे.कोकण पदवीधर मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार आहे. राष्ट्रवादीतर्फे ही जागा शेकाप सोडण्याची शक्यता आहे. शेकापच्या अलिबाग नगरपरिषदेच्या नगरसेविका व शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची सून चित्रलेखा पाटील या आघाडीच्या मार्फत लढण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून माजी महापौर संजय मोरे यांचे नाव चर्चेत आहे.नावनोंदणीकरिता टाळाटाळकोकण पदवीधर मतदार संघाच्या नावनोंदणीसाठी हजारो मतदार इच्छुक असताना देखील या मतदारांना तालुकानिहाय तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकाºयांकडून योग्य माहिती दिली जात नाही. या मतदार संघातील मतदारांना मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी ३१ मे अंतिम तारीख असून देखील अनेक ठिकाणी अर्जदारांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत असा आरोप खारघरमधील मंगेश रानवडे यांनी केला आहे . शासकीय अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले आहे. यावर्षी देखील हजारो मतदारांना आपले नाव मतदान यादीत येण्याची प्रतीक्षा आहे.