पनवेलच्या विकासाशी आघाडी कटिबद्ध

By admin | Published: May 4, 2017 06:17 AM2017-05-04T06:17:13+5:302017-05-04T06:17:13+5:30

शेतकरी कामगार पक्ष, काँगे्रस व राष्ट्रवादी आघाडीची वज्रमूठ एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी जात आहे. पनवेलच्या

Dedicated to the development of Panvel | पनवेलच्या विकासाशी आघाडी कटिबद्ध

पनवेलच्या विकासाशी आघाडी कटिबद्ध

Next

पनवेल : शेतकरी कामगार पक्ष, काँगे्रस व राष्ट्रवादी आघाडीची वज्रमूठ एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी जात आहे. पनवेलच्या विकासाशी आम्ही कटिबद्ध आहोत व आम्ही यापूर्वी विकास केल व यापुढेही करून दाखविणार. आमची पक्षाशी व विचारांशी बांधीलकी आहे; परंतु दुसरीकडे स्वार्थासाठी पाच वर्षांनी पक्ष बदलणारे भाजपातून निवडणूक लढवत असून त्यांच्यामुळेच पनवेलचा विकास खुंटल्याची टीका शेकापचे नेते विवेक पाटील यांनी केली आहे.
पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमत व्यासपीठ उपक्रमामध्ये विवेक पाटील यांनी शेकाप, काँगे्रस व राष्ट्रवादीच्या आघाडीची भूमिका विशद केली. निवडणुका आल्या की अनेकजण आश्वासनांशी खैरात करतात व पक्ष कार्यालये सुरू करतात; पण शेकापची चोवीस तास जनतेशी बांधीलकी आहे. निवडणुका नसल्या तरी आम्ही नियमितपणे जनतेच्या संपर्कात असतो. सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही आम्ही आघाडीवर असतो. महापालिकेमधील वेतनापासून वंचित कामगारांना न्याय देण्यासाठी आंदोलन केले. बाळाराम पाटील यांनी विधानपरिषदेमध्ये आवाज उठविला. खारघर ते कळंबोली, कामोठे परिसरामध्ये अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या कंडोनियमअंतर्गत कामे मार्गी लावली. मालमत्ता कराविषयी जनहिताची भूमिका घेतली. प्रत्येक नागरिक आपलाच समजून त्याच्या अडचणी सोडविण्यास शेकापने नेहमीच प्राधान्य दिले आहे. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील पाणीप्रश्न सोडविण्यावर भर देणार. चांगले रस्ते, शाळा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देणार आहोत.
आम्ही विचारांची लढाई लढत असून आमची बांधीलकी सर्वसामान्य नागरिकांशी आहे. दुसरीकडे स्वार्थासाठी प्रत्येक पाच वर्षांनी पक्ष बदलणारे आहेत. प्रशांत ठाकूर यांनी खारघर टोलनाका बंद करण्यासाठी काँगे्रस सोडली; पण टोल बंद झाला नाही. उलट निवडणुकीनंतर त्यांच्याशी संबंधित कंपनीने उरणमधील दोन टोल नाक्यांचे ठेके घेतले. म्हणजे स्वत:च्या कंपनीला ठेका मिळाला की टोल हवा व जिथे मिळाला नाही तिथे टोलमुक्ती असा त्यांचा अजेंडा असल्याची टीकाही केली. भाजपा निवडणुकांच्या तोंडावर आमच्यावर आरोप करत आहे; पण त्यांची नगरपालिकेत सत्ता असताना वडाळे तलवात दासभक्तांनी केलेल्या कामांची खोटे बिले लाटली असल्याचा आरोपही त्यांनी भाजपावर केला. आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समित्या, कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जिंकल्या असून महापालिकेमध्येही विजय मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सदैव जनतेसोबत
निवडणुका आल्या की प्रत्येकजण कार्यालये सुरू करतात; परंतु शेतकरी कामगार पक्ष सदैव जनतेबरोबर होता व भविष्यातही जनतेसोबत राहील. सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आम्ही लढे दिले आहेत. पनवेल विकसित होत असताना देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येथे राहण्यासाठी येत आहेत. कोणताही जातीभेद, प्रांतभेद न करता सर्वांनाबरोबर घेऊन जात असल्यानेच शेकाप प्रत्येकाला आपला पक्ष वाटत असल्याचेही स्पष्ट केले.

पनवेलचा सर्वांगीण विकास
शेतकरी कामगार पक्षाचे जे. एम. म्हात्रे पनवेलचे नगराध्यक्ष असताना एका वर्षात उत्पन्न दुप्पट केले व कार्यकाल पूर्ण करेपर्यंत उत्पन्नामध्ये चारपट वाढले. पनवेल महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक १२०० कोटी गृहित धरले जात आहे. आम्ही पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून पाच वर्षांत ते उत्पन्न ५००० कोटीवर. पनवेल मधील पिण्याचा प्रश्न गंभीर आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी देहरंग धरणातील गाळ काढला असता तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असताच. भविष्यात आम्ही स्वत:च्या मालकीचे पाण्याचे स्रोत वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणार असून आमच्या जाहीरनाम्यात पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे धोरण असणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: Dedicated to the development of Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.