जयंत धुळप/ पनवेल - दीक्षा मनोज सोनार हीच्या "स्वच्छता अभियान व पर्यावरण" या विषयावरील "प्रभाव"( द इम्पॅक्ट ) या लघुपटास विज्ञान प्रसार आयोजित आठव्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सव भारत सरकार 2018 करिता नामांकन प्राप्त झाले आहे. दीक्षा ही नवीन पनवेल खांदा कॉलनीमधील न्यू हॉरिझन पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. या लघुपटाची संकल्पना दीक्षा हिची असून दिग्दर्शनदेखील तिनेच केले आहे.
राष्ट्रीय विज्ञान महोत्सवात डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी अंतर्गत विज्ञान प्रसार नवी दिल्ली, भारत सरकार ''विद्यार्थी" डी "वर्ग साठी(इ.सहावी ते इ.बारावी )विद्यार्थ्याकरीता असलेल्या स्पर्धेत हे नामांकन मिळाले असून त्याचा पारितोषिक वितरण सोहळा गुवाहाटी विद्यापीठ (आसाम) व विज्ञान प्रसार नवी दिल्ली भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीदरम्यान गुवाहाटी येथे होणार आहे. नामांकन झालेल्या लघुपट यादी www.vigyanprasar.gov.in. वर उपलब्ध आहे.
या चित्रपट महोत्सवासाठी दीक्षा व या लघुपटाचे एडिटर, कॅमेरामन राजेश लाड व या चित्रपटाचे क्रू मेंबर व पालक म्हणून मनोज सोनार यांना महोत्सवात निमंत्रित करण्यात आले आहे.
दीक्षा सोनार