डीलरशिपच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:42 AM2019-03-04T05:42:23+5:302019-03-04T05:42:33+5:30

एका मोबाइल कंपनीची डीलरशिप मिळवून देतो, असे सांगून खारघर येथील धर्मेंद्रकुमार रामपारस सिन्हा (४५) यांची अज्ञात व्यक्तींनी सहा लाख ६४ हजारांची फसवणूक केली आहे.

Defecation of dealerships looted Rs.25 lakhs | डीलरशिपच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

डीलरशिपच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

googlenewsNext

पनवेल : एका मोबाइल कंपनीची डीलरशिप मिळवून देतो, असे सांगून खारघर येथील धर्मेंद्रकुमार रामपारस सिन्हा (४५) यांची अज्ञात व्यक्तींनी सहा लाख ६४ हजारांची फसवणूक केली आहे. खारघर पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.
खारघर येथील धर्मेंद्रकुमार रामपारस सिन्हा यांचा कळंबोलीत इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांना मोबाइलवर अज्ञात व्यक्तीचा डीलरशिप घेण्यासाठी फोन आला होता. सिन्हा यांनी इच्छुक असल्याचे सांगितल्यावर त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती, दुकानाची माहिती, तसेच गुंतवणूक रक्कम आदीबाबत अर्ज भरून घेण्यात आला. याशिवाय प्रोसेसिंग फी म्हणून १५ हजार २०० रु पये भरावे लागतील, असे सांगितले. सिन्हा यांनी ते पैसे भरल्यानंतर वारंवार अ‍ॅग्रिमेंट फी, मोबाइल, टीव्ही चार्जरसह मटेरियलसाठी पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार एकूण सहा लाख ६४ हजार रुपये त्यांनी भरले होते.

Web Title: Defecation of dealerships looted Rs.25 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.