मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नेरूळ-उरण मार्गावरील खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्याच्या उपनगरीय रेल्वे सेवेचा शुभारंभ झाला. नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची निर्मिती सिडकोने केली आहे. असे असले तरी स्थानकांची नियमित देखभाल व डागडुजी करण्यास सिडको अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. कारण आजही अनेक स्थानकांची दुरवस्था झाली आहे. पाणपाई, पंखे, स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाली आहे. काही स्थानकांवर फेरीवाल्यांनी घुसखोरी सुरू केली आहे. फलाटावर मोकाट कुत्र्यांचा बिनधास्त वावर वाढला आहे. नवी मुंबईसह पनवेल विभागातील स्थानकातील समस्यांचा ‘लोकमत’चे छायाचित्रकार संदेश रेणोसे आणि भालचंद्र जुमलेदार यांनी घेतलेला आढावा...
सायबर सिटीच्या स्थानकांतील सुविधांचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 5:11 AM