- वैभव गायकरपनवेल - आरटीओ कार्यालयास समस्यांचा विळखा पडला आहे. अडगळीच्या ठिकाणी कार्यालय असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आवश्यकतेपेक्षा तब्बल १७ अधिकारी व कर्मचारी कमी असल्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा ताण वाढत असून, त्याचा फटका नागरिकांनाही बसू लागला आहे.शासनाने राज्यातील ३७ प्रादेशिक परिवहन अधिकाºयांवर कारवाई केली. यामध्ये पनवेलमध्ये काम केलेल्या सहा जणांचा समावेश आहे. यामधील चौघांची यापूर्वी बदली झाली असून दोन जण सद्यस्थितीमध्ये कार्यरत होते. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली असून पनवेल आरटीओ कार्यालयही पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. येथील समस्यांकडेही लक्ष वेधले जाऊ लागले आहे. आरटीओ कार्यालयासाठी ६९ जागा मंजूर आहेत; परंतु प्रत्यक्षात ५४ अधिकारी व कर्मचारीच उपलब्ध असून त्यामधीलही दोन जणांचे निलंबन झाले असल्यामुळे कर्मचाºयांची संख्या ५२ झाली आहे. सद्यस्थितीमध्ये एक प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, १८ सहायक मोटार वाहन निरीक्षक, दहा सहायक मोटारवाहन निरीक्षक यांच्यासह सर्व कर्मचारी पकडून ५० ते ५४ कर्मचारी व अधिकारी कार्यरत असतात. राज्यातील सर्वाधिक कामकाज असणाºया कार्यालयांमध्ये पनवेलचा समावेश आहे. येथे रोज सरासरी १२० ते १६० वाहनांची नोंदणी होत असते. या गाड्यांची पासिंग, लायसन्स, चेकिंग तसेच विविध कामे सहायक मोटारवाहन निरीक्षक करीत असतात. पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे उपलब्ध कर्मचाºयांवरील ताण वाढू लागला आहे. शासनाने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाला असंख्य समस्यांचा गराडा पडला आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय हे कळंबोली लोह-पोलाद बाजारपेठेत आहेत. या ठिकाणी पार्किंग, तसेच विविध समस्या आहेत. अपुºया जागेमुळे या ठिकाणी येणाºया नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. स्वत:ची जागा नसल्यामुळे भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेवर कार्यालय सुरू आहे. अपुरी जागा व इतर समस्यांमुळे येथे कामासाठी येणाºया नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. परिवहन कार्यालयासाठी करंजाडे येथे जागा मंजूर करण्यात आली आहे.पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मंजूर पदांची संख्यापनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात एकूण ६९ पदांची मंजुरी मिळाली आहे, यामध्ये ३६ अधिकारी आहेत, तर उर्वरित कर्मचारी आहेत. मात्र, सध्याच्या घडीला केवळ ५४ पदे भरलेली आहेत. मंजूर पदांपेक्षा कमी मनुष्यबळावर पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा गाडा पुढे हाकला जात आहे. विशेष म्हणजे, यापैकीच दोन सहायक मोटारवाहन निरीक्षकांचे निलंबन झाल्याने हा ताण आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.समस्या सोडवाव्यापनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय हे कळंबोली लोह-पोलाद बाजारपेठेत आहेत. या ठिकाणी पार्किंग, तसेच विविध समस्या आहेत. अपुºया जागेमुळे या ठिकाणी येणाºया नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. या सर्व समस्या लवकर सोडवाव्या, अशी मागणी केली जात आहे.निलंबित अधिकाºयांमध्ये पनवेलचे सहा अधिकारीराज्यभरातील निलंबित केलेल्या ३७ आरटीओ अधिकाºयांच्या यादीत पनवेल कार्यालयातील सहा अधिकाºयांची नावे आहेत.सध्याच्या घडीला यापैकी दोन सहायक मोटारवाहन निरीक्षक या ठिकाणी कार्यरत होते.उर्वरित चार अधिकाºयांच्या २०१७ रोजीच बदल्या झाल्या असल्याने, ते राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत आहेत.
पनवेल आरटीओमध्ये अपुरे मनुष्यबळ, १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 7:11 AM