- वैभव गायकरपनवेल : खारघर शहरातील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडांचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांना शहराबाहेर अंत्यविधी करावा लागत आहे. एकीकडे खारघर शहर हे सिडकोच्या स्मार्ट सिटीच्या यादीत सर्वप्रथम आहे. मात्र, अंत्यविधीसाठी लाकडेही उपलब्ध होऊ शकत नसल्याने मृतदेहाची अवहेलना सुरू असल्याचे विदारक चित्र दुसरीकडे दिसून येत आहे.खारघर सेक्टर-१४ या ठिकाणी सिडकोने उभारलेली स्मशानभूमी असून, तिची अवस्था दयनीय झाली आहे. मात्र, पर्याय नसल्याने नातेवाइकांना याच ठिकाणी अंत्यविधी करावे लागत आहेत. शुक्र वारी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या एका कुटुंबीयाला स्मशानभूमीत लाकडे उपलब्ध नसल्याने बेलापूर या ठिकाणी जाऊन अंत्यविधी करावे लागले. एकविसाव्या शतकातील शहर म्हणून बिरु दावली मिरवणाºया सिडको प्रशासनाला हे कृत्य शोभणारे नाही. दु:खाचे डोंगर कोसळलेले शोकाकुल कुटुंब याबाबत वाच्यता करण्याच्या मनस्थितीतही नव्हते. विशेष म्हणजे, सिडको मार्फत शहरातील स्मशानभूमीच्या देखरेखीसाठी कोट्यवधी रुपये कंत्राटदाराला दिले जातात. मात्र, एवढे पैसे खर्च करूनही अंत्यविधीसाठी वेळेवर लाकडे उपलब्ध होत नाहीत, हे दुर्दैव. खारघर नोड हे पनवेल महापालिकेच्या अखत्यारीत येत असले, तरी सिडको नोडचे हस्तांतर झाले नसल्याने पालिका आपली जबाबदारी सिडकोकडे झटकत आहे. मात्र, हस्तांतराचे कारण पुढे करीत सिडकोदेखील विविध विकासकामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातील स्मशानभूमींची अवस्था आणखी बिकटपनवेल महानगरपालिका हद्दीत २९ गावांचा समावेश आहे. यापैकी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. उर्वरित स्मशानभूमीत मृतदेह ठेवण्यासाठी देखील योग्य जागा नाही. पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतींनीही याकडे दुर्लक्ष केले आहे, तसेच पालिका प्रशासनदेखील याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.जबाबदारी सर्वस्वी सिडकोचीखारघर नोडही पनवेल महापालिकेत समाविष्ट झाले असले, तरी या नोडचे हस्तांतर अद्याप पालिकेकडे झालेले नाही, त्यामुळे स्मशानभूमीची देखरेख पूर्णपणे सिडकोची जबाबदारी आहे.- जमीन लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिकापनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोने परिसराच्या विकासाबाबत हात झटकल्याचे दिसून येत आहे. एकीकडे नवी मुंबई महानगरपालिका अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करून देत असताना, खारघरमधील स्मशानभूमीत पैसे खर्चूनही लाकडे मिळत नाहीत. नागरिकांनी या संदर्भात तक्रार केल्यावर याबाबत पनवेल महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.- जयेश गोगरी, कार्याध्यक्ष, शाश्वत फाउंडेशन, खारघर
खारघर स्मशानभूमीत मृतदेहाची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 4:46 AM