शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

प्रकल्पग्रस्तांच्या भूखंड वाटपातही दिरंगाई

By admin | Published: June 08, 2015 4:12 AM

शासनाने १९९० ला नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के जमीन परत देण्याचा निर्णय घेतला. परंतु या भूखंड वाटपाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईशासनाने १९९० ला नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के जमीन परत देण्याचा निर्णय घेतला. परंतु या भूखंड वाटपाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. २५ वर्षांनंतरही शंभर टक्के भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काचे भूखंड मिळाले नसून सिडकोच्या या उदासीनतेविषयी भूमिपुत्रांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मुंबईवरील लोकसंख्येचा वाढता ताण दूर करण्यासाठी शासनाने ठाणे, पनवेल व उरण तालूक्यामधील ९५ गावांमधील जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला. शहर वसविण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली. येथील भूमिपुत्रांची ३४४ चौरस किलोमीटर क्षेत्रावरील १७ हजार हेक्टर जमीन ताब्यात घेतली. प्रकल्पग्रस्तांना एक एकरसाठी ५ हजार रुपये दर निश्चित केला होता. परंतु याविरोधात लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा उभारण्यात आला. यामुळे शासनाने हा दर ७ हजार रुपये व नंतर १५ हजार रुपये करण्यात आला. ठाणे तालुक्यामधील अनेक शेतकऱ्यांना त्यांची जमीन १५ हजार रुपये एकर दराने शासनास द्यावी लागली. यानंतरही आंदोलन सुरूच राहिले. अखेर शासनाने एकरसाठी ३० हजार रुपये दर निश्चित करण्यात आला. शेतकऱ्यांचा जमीन संपादनासाठीचा विरोध वाढतच चालला होता. संपादनासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले जात होते. जासईमधील दास्तानमध्ये निखराचे आंदोलन झाले. शासनाने प्रकल्पग्रस्तांवर गोळीबार केला व त्यामध्ये ५ प्रकल्पग्रस्त हुतात्मा झाले. यानंतर शासनाने नरमाईची भूमिका घेवून १९९० मध्ये एकूण जमिनीच्या साडेबारा टक्के जमीन पुन्हा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी साडेबारा टक्के योजना सुरू केली. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र अत्यंत धीम्या गतीने सुरू झाली. तब्बल २५ वर्षे झाली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे भूखंड दिलेले नाहीत. एकूण १०६४ हेक्टर जमिनीचे वाटप करायचे होते. सिडकोने संकेतस्थळावर ९० टक्के वाटप पूर्ण झाले असल्याचे स्पष्ट केले आहे. दहा टक्के वाटप शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. भूखंड वाटपाची वर्षनिहाय माहितीही दिली आहे. परंतु नक्की किती शेतकऱ्यांना भूखंड वाटप करायचे शिल्लक आहे याचा नेमका आकडा मात्र लपविला जात आहे. ज्यांना भूखंड मंजूर केले त्यांना त्यांचा शंभर टक्के ताबा मिळाला का याचीही माहिती नाही. अनेक ठिकाणी वारसदारांमध्ये सुरू असलेली भांडणे, न्यायालयीन वाद, अतिक्रमण यामुळे भूखंड वाटप धीम्या गतीने सुरू असल्याचे सांगितले जात आहे. परंतु योजना जाहीर झाली तेव्हाच वेगाने वाटप करण्यास सुरवात केली असती तर पहिल्या पाच वर्षांत ही योजना पूर्णपणे मार्गी लागली असती. भूखंड वाटप झाले असते तर गरजेपोटी अनधिकृत घरेही बांधावी लागली नसती असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.