धोकादायक अनधिकृत जाहिरात फलक हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:49 PM2018-11-02T22:49:02+5:302018-11-02T22:49:55+5:30
पनवेल महापालिकेची कारवाई; परवानगीसाठी ४५ कंपन्यांचे अर्ज
पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रातील धोकादायक अनधिकृत जाहिरात फलकांवर पनवेल महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने कारवाई केली. मंगळवारी पालिकेचे खारघर विभागप्रमुख भगवान पाटील यांनी सायन-पनवेल मार्गावरील कोपरा येथील तीन कंपन्यांचे जाहिरात फलक हटविले.
तत्कालीन खारघर ग्रामपंचायतींकडून नियमबाह्य ना हरकत दाखले देऊन अनेक बेकायदा जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर बेकायदा जाहिरात फलकावर कारवाई करण्याचा बडगा उचलण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पुणे येथे घडलेल्या प्रकारामुळे राज्यभर धोकादायक फलकाचा विषय ऐरणीवर आला होता. जाहिरात फलक उभारण्याच्या परवानगीसाठी ४५ कंपन्यांनी पालिकेकडे अर्ज सादर केले आहेत.