संभाजी भिडेंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाईची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 08:16 AM2018-06-15T08:16:24+5:302018-06-15T08:16:24+5:30

माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे अजब विधान श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. या विधानाप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

Demand for action against Sambhaji Bhide | संभाजी भिडेंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाईची मागणी 

संभाजी भिडेंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाईची मागणी 

Next

नवी मुंबई - माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे अजब विधान श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. या विधानाप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.  नेरुळ पोलिसात याबाबत तक्रार करण्यात आली आहे. भिडे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करुन वैद्यकीय क्षेत्राला आव्हान दिले आहे. तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यानुसार गर्भलिंग निदान व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन करवाईची मागणी करण्यात आली आहे. 

पाकिस्तान नव्हे तर सुशिक्षित हिंदूंचाच देशाला जास्त धोका- संभाजी भिडे

काय आहे नेमके प्रकरण?

माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे अजब विधान श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. रविवारी (10 जून) संभाजी भिडे यांची नाशिक येथे सभा झाली होती. यावेळी भिडे यांनी म्हटले की, माझ्या शेतातील आंबा खाल्लास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत 180 हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील 150 जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी केला. आपल्या शेतातील आंब्यामुळे अपत्यप्राप्ती होते ही बाब फक्त आईलाच सांगितली होती. आता तुम्हाला सांगत असल्याचे भिडे यांनी सभेत म्हटले.

भविष्यात तलवार हातात घ्यावीच लागेल- संभाजी भिडे

तत्पूर्वी रायगड येथे 32 मण सुवर्णसिंहासनाची पुनर्स्थापना आणि खडा पहारा तुकडी निर्मितीच्या प्रचार-प्रसारासाठी नाशिकमध्ये रविवारी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतही भिडे यांची काही विधाने लक्ष वेधून घेणारी ठरली होती. रायगडावरील सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे काय चालू आहे, म्हणून टीका करतील. त्यामुळे तुर्तास याठिकाणी धारकरी काठ्याच घेऊन जातील. परंतु, भविष्यात त्यांच्यावर तलवारी हातात घेऊन जाण्याची वेळ नक्कीच येणार आहे, असे संभाजी भिडे यांनी सांगितले. 

 

Web Title: Demand for action against Sambhaji Bhide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.