हवा प्रदूषण करणा-या कंपन्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 01:05 AM2017-12-07T01:05:00+5:302017-12-07T01:05:05+5:30

तळोजा परिसरातील कारखान्यातून रात्री बारा ते पहाटे पाच या वेळेत हवेत सोडल्या जाणाºया वायुप्रदूषणामुळे जीव घाबरणे, दम लागणे असे प्रकार परिसरात घडत आहेत.

Demand for action on air pollution companies | हवा प्रदूषण करणा-या कंपन्यांवर कारवाईची मागणी

हवा प्रदूषण करणा-या कंपन्यांवर कारवाईची मागणी

Next

पनवेल : तळोजा परिसरातील कारखान्यातून रात्री बारा ते पहाटे पाच या वेळेत हवेत सोडल्या जाणाºया वायुप्रदूषणामुळे जीव घाबरणे, दम लागणे असे प्रकार परिसरात घडत आहेत. प्रदूषण महामंडळाने गांभीर्याने लक्ष घालून या कारखान्यावर योग्य ती कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेविका नेत्रा पाटील यांनी प्रदूषण मंडळ अधिकारी अनिल मोहेकर यांना दिले आहे.
तळोजा परिसरातील कारखान्यातून रात्री सोडल्या जाणाºया वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढले आहेत. झोपी गेलेल्या व्यक्तीस रात्री येणाºया उग्र वासामुळे घरातील गॅस सिलिंडरला गळती लागल्याचा भास होत असल्याचे प्रकार तळोजा आणि खारघर परिसरात वाढले आहे. त्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींना श्वास घेताना त्रास होत असल्याचे दिसून येते. नागरिकांच्या वाढत्या तक्र ारी घेऊन नेत्रा पाटील आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सीबीडी बेलापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात प्रादेशिक अधिकारी अनिल मोहेकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन वाढत्या प्रदूषणाविषयी चिंता
व्यक्त केली.
नेत्रा पाटील म्हणाल्या, झोपेत असताना घरातील सिलिंडरला गळती लागण्याचा भास झाला. असाच प्रकार खारघर परिसरातील सेक्टर १३ ते ३५ परिसर, तसेच तळोजा परिसरात होत असल्याचे नागरिकांकडून समजले. हा प्रकार तळोजा परिसरातील रासायनिक कंपन्यांतील हवेत सोडल्या जाणाºया घातक प्रदूषणामुळे होत असल्याचे अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले आहे. मोहेकर यांनी दोन दिवसांत वायुप्रदूषणाबाबत चाचणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, तसेच आरोग्यास हानिकारक वायूंचे प्रमाण तपासण्यात येईल व हिवाळ्यातील पुढील काही महिने ही तपासणी चालू राहणार असल्याचे आश्वासन दिले आहेत. या वेळी खारघर भाजपा सरचिटणीस किरण पाटील, सेक्टर १९ चे अध्यक्ष दिलीप जाधव, राजेश मोटेवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Demand for action on air pollution companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.