पाणी चोरांवर गुन्हे दाखल करण्याची केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 02:46 AM2019-12-24T02:46:21+5:302019-12-24T02:46:37+5:30

नागरिकांचा पाठपुरावा : वाशी ते सानपाडा दरम्यान जलवाहिनी फोडली

Demand for criminal prosecution of water thieves | पाणी चोरांवर गुन्हे दाखल करण्याची केली मागणी

पाणी चोरांवर गुन्हे दाखल करण्याची केली मागणी

Next

नवी मुंबई : सानपाडा ते वाशी दरम्यान दहा वर्षांपासून सातत्याने जलवाहिनी फोडून पाणीचोरी केली जात आहे. अनधिकृतपणे बसेस उभे करणारे आम्ही पाणी चोरणारच असे उद्दामपणे बोलू लागले आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली असून, या परिसरामध्ये बसेस उभ्या करण्यावर बंदी करण्याची मागणीही केली आहे.

सानपाडा रेल्वे स्टेशनकडून वाशी स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर ही जलवाहिनी फोडली जात आहे. जवळपास ८ ते १० वर्षांपासून सातत्याने येथून पाणीचोरी होत आहे. लोकमतने १० डिसेंबरला याविषयी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महानगरपालिकेने तत्काळ गळती थांबविली होती. परंतु पालिका कर्मचारी गळती थांबविण्याचे काम करत असताना त्या ठिकाणी उभ्या असलेल्या बसचालकांनी आम्ही पुन्हा जलवाहिनी फोडणार अशा वल्गना करण्यास सुरुवात केली.

पाणीचोरी कायमस्वरूपी थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशांत पवार यांनी याविषयी आवाज उठविला आहे. पाणीचोरीला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. येथे अनधिकृतपणे उभ्या करण्यात येणाºया बसेसवर कारवाई केली जावी. येथे बसेस उभ्या करण्यावर मनाई करण्यात यावी. वाहने धुताना जे आढळतील त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करून पाणीचोरीचा गुन्हा दाखल करावा. ज्या ठिकाणी व्हॉल्वमधून पाणीचोरी होते, तेथे पुन्हा गळती होऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडेही तक्रार केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

च्वाशी परिसरातील आयटी पार्कमध्ये नोकरी करणाºया कर्मचाºयांची ने-आण करण्यासाठी खासगी बसेसची सोय करण्यात आली आहे. या सर्व बसेस या रोडवर उभ्या करण्यात येतात. परप्रांतीय चालक या बसेसवर काम करत आहेत. हे सर्व चालक ही जलवाहिनी फोडून त्या पाण्याचा कपडे धुणे, आंघोळ करण्यासाठी वापर करत आहेत.

च्याशिवाय काही जण बसेसमध्ये गॅस व स्टोव्हचा वापर करून स्वयंपाक करतात. येथे दिवसभर वाहने धुण्याचे कामही सुरू असते. परिसरामध्ये रोडवर व झोपडीत राहणारे नागरिकही येथील पाण्याचा वापर करत असतात. महापालिकेने जलवाहिनीची दुरूस्ती केली की, दुसºयाच दिवशी पुन्हा ती फोडली जात आहे.

Web Title: Demand for criminal prosecution of water thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.