शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पाणी चोरांवर गुन्हे दाखल करण्याची केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 2:46 AM

नागरिकांचा पाठपुरावा : वाशी ते सानपाडा दरम्यान जलवाहिनी फोडली

नवी मुंबई : सानपाडा ते वाशी दरम्यान दहा वर्षांपासून सातत्याने जलवाहिनी फोडून पाणीचोरी केली जात आहे. अनधिकृतपणे बसेस उभे करणारे आम्ही पाणी चोरणारच असे उद्दामपणे बोलू लागले आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली असून, या परिसरामध्ये बसेस उभ्या करण्यावर बंदी करण्याची मागणीही केली आहे.

सानपाडा रेल्वे स्टेशनकडून वाशी स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर ही जलवाहिनी फोडली जात आहे. जवळपास ८ ते १० वर्षांपासून सातत्याने येथून पाणीचोरी होत आहे. लोकमतने १० डिसेंबरला याविषयी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महानगरपालिकेने तत्काळ गळती थांबविली होती. परंतु पालिका कर्मचारी गळती थांबविण्याचे काम करत असताना त्या ठिकाणी उभ्या असलेल्या बसचालकांनी आम्ही पुन्हा जलवाहिनी फोडणार अशा वल्गना करण्यास सुरुवात केली.

पाणीचोरी कायमस्वरूपी थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशांत पवार यांनी याविषयी आवाज उठविला आहे. पाणीचोरीला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. येथे अनधिकृतपणे उभ्या करण्यात येणाºया बसेसवर कारवाई केली जावी. येथे बसेस उभ्या करण्यावर मनाई करण्यात यावी. वाहने धुताना जे आढळतील त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करून पाणीचोरीचा गुन्हा दाखल करावा. ज्या ठिकाणी व्हॉल्वमधून पाणीचोरी होते, तेथे पुन्हा गळती होऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडेही तक्रार केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.च्वाशी परिसरातील आयटी पार्कमध्ये नोकरी करणाºया कर्मचाºयांची ने-आण करण्यासाठी खासगी बसेसची सोय करण्यात आली आहे. या सर्व बसेस या रोडवर उभ्या करण्यात येतात. परप्रांतीय चालक या बसेसवर काम करत आहेत. हे सर्व चालक ही जलवाहिनी फोडून त्या पाण्याचा कपडे धुणे, आंघोळ करण्यासाठी वापर करत आहेत.च्याशिवाय काही जण बसेसमध्ये गॅस व स्टोव्हचा वापर करून स्वयंपाक करतात. येथे दिवसभर वाहने धुण्याचे कामही सुरू असते. परिसरामध्ये रोडवर व झोपडीत राहणारे नागरिकही येथील पाण्याचा वापर करत असतात. महापालिकेने जलवाहिनीची दुरूस्ती केली की, दुसºयाच दिवशी पुन्हा ती फोडली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई