मच्छीमार संस्थांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तेल कंपन्यांप्रमाणे अनुदान देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 08:54 PM2023-06-20T20:54:54+5:302023-06-20T20:55:06+5:30
उरण : मच्छिमारांना डिझेल पुरवठा करणाऱ्या तेल कंपन्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते.याच पध्दतीने डिझेल पुरविणाऱ्या मच्छिमार सहकारी संस्थांनाही आर्थिकदृष्ट्या ...
उरण: मच्छिमारांना डिझेल पुरवठा करणाऱ्या तेल कंपन्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते.याच पध्दतीने डिझेल पुरविणाऱ्या मच्छिमार सहकारी संस्थांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी डिझेलमध्ये विक्रीमध्ये अनुदान देण्याची मागणी सोमवारी (१९) उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांची भेट घेऊन केली आहे.
राज्यातील मच्छीमारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी सोमवारी (१९) दिल्लीत केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान मार्तंड प्रसन्न कुलाबा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन अमोल रोगे, उरण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जयवीन कोळी आदी उपस्थित होते.या भेटीत पर्ससीन नेट मासेमारी करताना मच्छीमारांना येणाऱ्या अडी-अडचणी बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
तसेच मच्छिमारांना डिझेल पुरवठा करणाऱ्या तेल कंपन्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते.मात्र मच्छीमारांना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छीमार संस्थांना असे अनुदान दिले जात नाही.राज्यातील मच्छीमार संस्थांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी, सक्षम करण्यासाठी डिझेल पुरविणाऱ्या मच्छिमार सहकारी संस्थांनाही डिझेलमध्ये विक्रीमध्ये अनुदान देण्याची मागणी सोमवारी (१९) उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांची भेट घेऊन केली आहे.डिझेलचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तसे निर्देश देण्यासाठी मंत्रालयाच्या स्तरावरून योग्यती कार्यवाही करण्याची विनंतीही यावेळी निवेदन देऊन करण्यात आली आहे.