दिबांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ देण्याची मागणी
By admin | Published: June 28, 2017 03:26 AM2017-06-28T03:26:28+5:302017-06-28T03:26:28+5:30
लोकनेते दि. बा. पाटील यांना राज्य शासनाने यंदाचा ‘मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ घोषित करावा, त्यांनी १९८४मध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : लोकनेते दि. बा. पाटील यांना राज्य शासनाने यंदाचा ‘मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ घोषित करावा, त्यांनी १९८४मध्ये शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी दिलेल्या स्फूर्तिदायक लढ्यावरील विस्तृत लेखाचा महाराष्ट्र शासनाने पाठ्यपुस्तकात समावेश करावा, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने राज्याचे आणि सांस्कृतिकमंत्री यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यासंदर्भात त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात येईल, तसेच राज्यातील विविध पक्षांचे अध्यक्ष, आमदार, खासदारांना शिफारस करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे व पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनातून लोकनेते दि. बा. पाटील यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांच्या नावे ‘समाजभूषण पुरस्कार’ सुरू करण्यासोबत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. तसेच दोन्ही महापालिकांनी त्यांच्या परिक्षेत्रात दिबांचा पुतळा उभारावा, असेही सूचविण्यात आले आहे.
शिष्टमंडळात अध्यक्ष कांतीलाल कडू, उपाध्यक्ष विजय काळे, ज्येष्ठ सदस्या माधुरी गोसावी, पराग बालड, अॅड. संतोष सरगर, मच्छिंद्र नाईक, मंगल भारवड, कुंदा गोळे, भारती जळगावकर, रुपाली शिवथरे, वैशाली सुर्वे आदींचा समावेश होता.