पनवेल महापालिकेला हवे स्वतंत्र पोलीस ठाणे, आयुक्तांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 03:40 AM2018-11-08T03:40:24+5:302018-11-08T03:40:32+5:30

अतिक्रमण हटविताना महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. नुकतेच पालिकेच्या दोन कर्मचा-यावर हल्ले झाले.

The demand for the independent police station, commissioner, for the Panvel Municipal corporation | पनवेल महापालिकेला हवे स्वतंत्र पोलीस ठाणे, आयुक्तांकडे मागणी

पनवेल महापालिकेला हवे स्वतंत्र पोलीस ठाणे, आयुक्तांकडे मागणी

Next

पनवेल  - अतिक्रमण हटविताना महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. नुकतेच पालिकेच्या दोन कर्मचाºयावर हल्ले झाले. या विषयाची गंभीर दखल घेत आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेला स्वतंत्र पोलीस ठाण्याची स्थापना करण्याची मागणी गृहविभागाकडे केली आहे.
 
दोन वर्षांपूर्वी महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिले महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी अतिक्र मणावर कारवाई करून शहरे स्वच्छ केली. महापालिकेचे दुर्लक्ष झाले की पुन्हा व्यावसायिक आपले बस्तान बसवितात. अतिक्र मण पथकांतील कर्मचारी आणि नागरिक, व्यावसायिकांमध्ये वादाच्या घटना घडत आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांनी अतिक्र मणावर कारवाई करण्यासाठी चार स्वतंत्र पथके नेमण्याचा निर्णय घेतला. मात्र, महापालिकेकडे असलेल्या सुरक्षा मंडळाच्या सुरक्षारक्षकांचा धाक नसल्यामुळे वादाचे प्रमाण वाढून, कळंबोलीत कचºयाच्या वादातून एका कर्मचा-यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यापूर्वी कळंबोलीचे प्रभाग अधीक्षक भगवान पाटील यांच्यावर हल्ला झाला होता. तर मागील आठवड्यात पनवेलचे प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांच्यावरही हल्ला झाला. वारंवार होणारे हल्ले लक्षात घेऊन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिकेसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे असावे, असा प्रस्ताव तयार केला आहे. महापालिकेच्या अतिक्र मण पथकांत पोलीस असल्यास हल्ल्यासारख्या घटना होणार नाहीत.

पोलीस ठाण्याची रचना

स्वतंत्र पोलीस ठाण्यात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक महिला पोलीस उपनिरीक्षक, १६ सशस्त्र पोलीस हवालदार, चार महिला पोलीस हवालदार अशा एकूण २२ कर्मचा-यांचे हे पोलीस ठाणे असावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: The demand for the independent police station, commissioner, for the Panvel Municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल