- प्राची सोनवणे, नवी मुंबई आठवडाभरापासून बाजारात द्राक्षांची मागणी वाढली आहे. राज्यभरातून वाशीतील एपीएमसी फळबाजारात आठ ते दहा गाड्या द्राक्षांची आवक होत आहे. या महिन्याच्या सुरु वातीला द्राक्षांची आवक कमी होती मात्र आता आवक वाढल्याने दरही आवाक्यात आहेत. एपीएमसी मार्केटमध्ये ११०० क्विंटल द्राक्षांची आवक झाली आहे. काळ््या द्राक्षांचे दर सफेद द्राक्षांच्या तुलनेने जास्त असून घाऊक बाजारात काळे द्राक्ष ५०,००० ते ६०,००० रुपये क्विंटल दराने उपलब्ध आहे. एपीएमसीत दररोज १० किलो द्राक्षांचे ४० टेम्पो बाजारात दाखल होत आहेत. दहा किलोच्या पेट्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नाशिकबरोबरच आता फलटण, बारामती, तासगाव, सांगलीवरूनही द्राक्षांची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारपेठेत काळ्या द्राक्षांच्या दहा किलोच्या पेटीकरिता ९०० ते १५०० रुपये तर ६५० ते १२०० रुपये किलो दराने सफेद द्राक्षांची विक्री केली जात आहे. आकाराने लांब असणाऱ्या सोनाक्का जातीच्या द्राक्षांची दहा किलोची पाटी ६०० ते १३०० रु पये दराने विकली जात आहे, तर सिडलेस द्राक्षांची दहा किलोची पेटी ५०० ते १ हजार रु पयांस मिळत आहे. दर घटण्याची शक्यतानोव्हेंबर ते एप्रिल हा द्राक्षांचा हंगाम असून पुढील काही आठवड्यांमध्ये द्राक्षांची आवक आणखी वाढणार असून दर कमी होण्याची शक्यता एपीएमसी फळ बाजाराचे व्यापारी संजय पानसरे यांनी व्यक्त केली. द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून ग्राहकांच्या मागणीनुसार आवक वाढत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
बाजारात द्राक्षांची मागणी वाढली
By admin | Published: February 03, 2017 2:51 AM