खारघर पोस्ट कार्यालय अन्यत्र हलविण्याची मागणी

By admin | Published: February 13, 2017 05:17 AM2017-02-13T05:17:04+5:302017-02-13T05:17:04+5:30

स्मार्ट शहर म्हणून खारघरचा विकास होत असला, तरी येथील टपाल सेवेला घरघर लागली आहे. सध्याचे युग इंटरनेटचे असले तरी

The demand for moving the Kharghar post office elsewhere | खारघर पोस्ट कार्यालय अन्यत्र हलविण्याची मागणी

खारघर पोस्ट कार्यालय अन्यत्र हलविण्याची मागणी

Next

पनवेल : स्मार्ट शहर म्हणून खारघरचा विकास होत असला, तरी येथील टपाल सेवेला घरघर लागली आहे. सध्याचे युग इंटरनेटचे असले तरी आजही टपालची सेवा विश्वासार्ह मानली जाते. मात्र, खारघर शहरातील अपुऱ्या जागेत सुरू असलेल्या या टपाल कार्यालयामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हलविण्याची मागणी खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरु नाथ गायकर यांनी सिडकोकडे केली.
खारघरमध्ये एकूण ४० सेक्टरचा समावेश आहे. त्यामुळे कार्यालयात येण्यासाठी प्रत्येक वेळी जवळपास १०० रुपये रिक्षाभाडे द्यावे लागते. कार्यालयात पोस्टमन, क्लार्क आदी मिळून जवळपास २० कर्मचारी आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचारी संख्या अपुरी असल्याने ती वाढवणेही गरजेचे आहे. अपुऱ्या जागेमुळे अनेकदा महत्त्वाची कागदपत्रे कार्यालयाच्या बाहेर ठेवावी लागतात. त्यामुळे सेक्टर ३५ सह २१, ११, १३, १९ या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय हलविण्याची मागणी सिडकोकडे केली आहे.

Web Title: The demand for moving the Kharghar post office elsewhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.