कच-यापासून खतनिर्मिती करणा-या मशिन धूळखात, योग्य पावले उचलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:43 AM2017-11-22T02:43:59+5:302017-11-22T02:44:10+5:30

पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक ६ मध्ये अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या कच-यापासून खतनिर्मिती करणा-या मशिन धूळखात पडल्या आहेत.

Demand for proper operation of waste from machine-to-machine dust, from waste | कच-यापासून खतनिर्मिती करणा-या मशिन धूळखात, योग्य पावले उचलण्याची मागणी

कच-यापासून खतनिर्मिती करणा-या मशिन धूळखात, योग्य पावले उचलण्याची मागणी

googlenewsNext

पनवेल : पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक ६ मध्ये अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या कच-यापासून खतनिर्मिती करणा-या मशिन धूळखात पडल्या आहेत. विशेष म्हणजे लाखो रुपये किमतीच्या या मशिन पनवेल महानगरपालिकेने देखील वापरात आणल्या नसल्याने प्रभाग क्र मांक सहामधील नगरसेविका संजना कदम यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित करीत पालिका प्रशासनाने योग्य पावले उचलण्याची मागणी केली आहे.
पनवेल महापालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच खारघर, पनवेल शहरात सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराजांचे जनप्रबोधनापर कार्यक्र म पार पडले. १ डिसेंबरपासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १०० किलो वजनाचा रोजचा कचरा निर्माण करणाºया सोसायटीचा वर्गीकरण न केलेला कचरा उचलणार नसल्याचे आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, एकीकडे कचºयापासून खतनिर्मिती करणारे लाखो रु पयांचे मशिन पालिकेच्या दुर्लक्षामुळे बंद पडल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. खतनिर्मिती करणाºया या मशिनची किंमत प्रत्येकी दहा लाखांच्या घरात असल्याचे समजते. प्रभाग क्र मांक सहा हा खारघर सेक्टर १५ आणि १६ ला जोडलेला आहे. सिडकोने वसवलेल्या स्पॅगेटी, घरकूल, वास्तुविहार या वसाहतींचा यामध्ये सहभाग आहे. या सोसायट्यांमधून दररोज हजारो किलो कचरा बाहेर पडत आहे. त्यादृष्टीने या कचºयाच्या मशिन कार्यान्वित केल्यास पालिकेचा मोठा फायदा होणार आहे. कचरा उचलण्यासाठी लागणाºया लाखो रु पयांच्या निधीची बचत यामुळे होणार आहे. सध्याच्या घडीला या चार मशिन स्पॅगेटी आणि वास्तुविहार सोसायटीत ठेवण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात महानगरपालिकेच्या उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी सांगितले की, संबंधित मशिन या तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीने ठराव करून विकत घेतल्या होत्या. त्यानंतर या मशिन सेक्टर १५ मध्ये विविध सोसायट्यांना वितरित केल्या आहेत. सोसायट्यांनी त्या मशिन वापरात आणल्या नाहीत. सोसायट्या त्या मशिन वापरणार नसतील तर पालिकेकडे पुन्हा हस्तांतरित कराव्यात, आम्ही त्या मशिन कार्यान्वित करू.
घनकचरा व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने प्रभाग क्र मांक २ चे नगरसेवक पुढाकार घेऊन आपल्या प्रभागात सुमारे १२ लाख रु पये खर्चून दोन मशिन विकत घेतल्या. ओला व सुक्या कचºयावर प्रक्रि या करून त्यातून खत निर्मिती करण्याचा स्तुत्य उपक्र म सुरु केला.
आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील या प्रकल्पाला भेट दिली. मात्र पालिकेच्या मार्फत कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने अरविंद म्हात्रे यांनी महिनाभराच्या आतच हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत ही माहिती त्यांनी सभागृहात दिली.

Web Title: Demand for proper operation of waste from machine-to-machine dust, from waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.