कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कर माफ करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:10 AM2020-07-24T00:10:31+5:302020-07-24T00:10:56+5:30
जवळपास ३५८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. नागरिकांध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
नवी मुंबई : कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर एक आठवड्यात लॉकडाऊन सुरू झाला. साडेतीन महिने नवी मुंबईमधील प्रमुख उद्योग बंद आहेत. नागरिकांना रोजगार नाही. जवळील शिल्लक असलेले पैसे संपले आहेत. घराचे व इतर कर्जांचे हप्ते भरता आलेले नाहीत. १२ हजारपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
जवळपास ३५८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. नागरिकांध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना महानगरपालिकेने सहकार्य केले पाहिजे. सद्य:स्थितीमध्ये मनपा कार्यक्षेत्रात ३ लाख २७ हजार मालमत्ताधारक आहेत. यामधील ५५० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ताधारकांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्यात यावा. ५५० चौरस फूटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्यांनाही टक्केवारीप्रमाणे मालमत्ता व पाणी करामध्ये सूट देण्यात यावी, अशी मागणी विजय चौगुले यांनी केली असून याविषयी आयुक्तांना पत्र दिले आहे. नवी मुंबई राज्यातील श्रीमंत महानगरपालिका आहे. महानगरपालिकेला एएप्लस पथमानांकन लाभले आहे. मनपाच्या गंगाजळीत पुरेसे पैसे आहेत.
नवी मुंबईमधील नागरिकांनी दिलेल्या करामुळेच मनपा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरवासी संकटात आहेत. अशा परिस्थितीत महानगरपालिकेने करमाफी करून दिलासा द्यावा यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे.
नवी मुंबईमधील नागरिकांचे उत्पन्न ठप्प झाले आहे. कोरोनामुळे प्रत्येक व्यक्ती आर्थिक संकटात असून शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता व पाणी दरात सूट देण्यात यावी.
- विजय चौगुले
माजी सिडको संचालक व विरोधी पक्ष नेत