शाळांबाहेरच्या टपऱ्या हटवण्याची मागणी

By admin | Published: November 17, 2016 06:21 AM2016-11-17T06:21:18+5:302016-11-17T06:21:18+5:30

विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून टाळण्याकरिता शाळांच्या आवारातील टपऱ्या हटवण्याची मागणी पुढे येवू लागली आहे.

Demand for removal of out-of-date skeleton | शाळांबाहेरच्या टपऱ्या हटवण्याची मागणी

शाळांबाहेरच्या टपऱ्या हटवण्याची मागणी

Next

नवी मुंबई : विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून टाळण्याकरिता शाळांच्या आवारातील टपऱ्या हटवण्याची मागणी पुढे येवू लागली आहे. अशा टपऱ्यांवर सिगारेट, गुटखा याशिवाय अमली पदार्थांची विक्री होत असल्यामुळे शाळकरी मुले नशेच्या आहारी जात आहेत.
शहरात अनेक ठिकाणी शाळांच्या लगतच टपऱ्यांवर सिगारेट, मावा तसेच गुटखा व इतर नशेच्या पदार्थांची विक्री होत असल्याचे पहायला मिळत आहे. शाळेपासून किमान १०० मीटरपर्यंत अशा अमली पदार्थांच्या विक्री व वापरावर बंदी असतानाही नियमांची पायमल्ली होताना पहायला मिळत आहे. शाळेच्या आवारातच सहज उपलब्ध होणाऱ्या या नशेच्या पदार्थांकडे विद्यार्थी एकमेकांच्या संगतीने आहारी जात आहेत. यामुळे बालगुन्हेगारी वाढत आहे. शाळांपासून ठरावीक अंतरावर सिगारेट अथवा इतर कोणत्याच नशेच्या पदार्थांची विक्री होवू नये अशी राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी संघटनेची मागणी आहे. याकरिता त्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी प्रशासन पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांची भेट घेवून निवेदन दिले. याप्रसंगी नगरसेवक मुनावर पटेल, जयंत हुद्दार, ऐरोली विधानसभा युवक अध्यक्ष राजेश मढवी, विद्यार्थी अध्यक्ष राहुल शिंदे, हरेश भोईर, प्रशांत आचार्या आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेत शाळांभोवती पोलिसांची गस्त वाढवून नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपआयुक्त पवार यांनी दिले.
शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी प्रत्येक शाळेसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. स्कूल बस व्यतिरिक्त खाजगी वाहनांमधून देखील अनेक विद्यार्थी येत असल्याने त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. परंतु जर ठरावीक वेळेकरिता शाळा व्यवस्थापनाने शाळेलगतचे मैदान पालकांच्या वाहनांसाठी खुले करावे, अशी मागणी राहुल शिंदे यांनी मांडली. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for removal of out-of-date skeleton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.