शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

धक्कादायक ! मृतदेह गुंडाळण्यासाठी ४ हजारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 1:12 AM

पालिका रुग्णालयात पैशासाठी अडवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वाशी येथील पालिका रुग्णालयात पैशासाठी मृतदेहांची अडवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्याच रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन जायचा अशी मक्तेदारी गाजवली जात आहे. तर मृतदेह गुंडाळून देण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी होत आहे. या प्रकरणाला सामोरे गेलेल्या व्यक्तीने पालिका आयुक्तांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात हा  धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी घणसोली येथे राहणाऱ्या अनुज दिवाकर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात आणला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्याच्या इलाहाबाद येथील मूळ गावी नेला जाणार होता. यासाठी त्याच्या भावाच्या परिचयाच्या व्यक्ती आर्थिक मदत करणार होत्या. परंतु शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह गुंडाळून ताब्यात देण्यासाठी तिथल्या कर्मचाऱ्यांनी चार हजार रुपयांची मागणी केली. शिवाय पैसे न दिल्यास मृतदेह आहे त्या स्थितीत घेऊन जा, अशी अरेरावी केली. अखेर तडजोड करून त्यांनी २ हजार रुपये घेऊन मृतदेह गुंडाळून दिला. मात्र त्यानंतर मृतदेह इलाहाबाद येथे घेऊन जाण्यासाठी रुग्णालयाच्या आवारातल्या रुग्णवाहिका व्यावसायिकांनी ४५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचे दर सांगितले. यामुळे ओळखीतून स्वस्तात ठरवलेली रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात येताच तिथल्या रुग्णवाहिका व्यावसायिकांनी दमदाटी करून मक्तेदारी दाखवण्यास सुरुवात केली. रुग्णालयातून मृतदेह बाहेर न्यायचा असेल तर आपलीच रुग्णवाहिका ठरवावी लागेल, असा दमदेखील भरल्याचा आरोप बोनकोडे येथील रहिवासी प्रदीप म्हात्रे यांनी केला आहे.

मृत्यूनंतरही झाले हालअनुज दिवाकर हा घणसोली सिम्प्लेक्स येथे पत्नीसह राहायला होता. त्याचा इस्त्रीचा व्यवसाय होता. डिसेंबरमध्येच त्याचे लग्न झाले होते. परंतु गेल्या महिन्यात पुन्हा शासनाने कठोर निर्बंध केल्याने ओढवलेले संकट व त्यातून घरी वाद सुरू होते. यामुळे गुरुवारी सकाळी त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र मृत्यूनंतरदेखील त्याच्या मृतदेहाला गावी पोहोचण्यासाठी पैशासाठी अडवणूक सहन करावी लागली.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या