मुंबईत उसाच्या रसाला मागणी
By admin | Published: October 17, 2015 11:39 PM2015-10-17T23:39:54+5:302015-10-17T23:39:54+5:30
आॅक्टोबर हीटमुळे मुंबई, नवी मुंबईतील तापमान ३६ डीग्री अंश सेल्सिअसवर गेले आहे. उखाड्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी नागरिकांची
- प्राची सोनावणे, नवी मुंबई
आॅक्टोबर हीटमुळे मुंबई, नवी मुंबईतील तापमान ३६ डीग्री अंश सेल्सिअसवर गेले आहे. उखाड्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी नागरिकांची पावले रसवंतीगृहाकडे वळू लागली आहेत. रोज २०० ते ३०० टन उसाची आवक होऊ लागली आहे. शहाळे, लिंबू व इतर शीतपेयांची मागणीही प्रचंड वाढली आहे.
पावसाने दडी मारल्यामुळे यावर्षी आॅक्टोबरमध्ये उन्हाची काहिली वाढली आहे. मुंबई, नवी मुंबई परिसरातील तापमान ३६ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले आहे. दिवसा घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. माथाडी व इतर कष्टाची कामे करणाऱ्या नागरिकांना उखाड्याचा खूपच त्रास होऊ लागला आहे. घराबाहेर पडलेले नागरिक असह्य उखाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी रसवंतीगृहांचा आधार घेऊ लागले आहेत. उसाची मागणी सर्वाधिक वाढली आहे. मुंबई, नवी मुंबई परिसरात रोज २०० ते ३०० टन ऊस रसवंतीगृहांसाठी लागत आहे. मागील पाच महिन्यांमध्ये तब्बल ३१,०१४ टन उसाची आवक झाली असल्याची माहिती मुुंबई बाजार समितीमधील पर्यवेक्षक जी. आर. चव्हाण यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातून लाकडी चरखे घेऊन अनेक शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. १० ते १५ रुपयांना उसाचा रस विकला जात आहे. पाऊस पडण्याची शक्यता कमी झाल्यामुळे यावर्षी उसाची मागणी प्रचंड वाढण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
उखाड्यामुळे शहाळ्यांनाही मागणी वाढली आहे. दाक्षिणात्य राज्यातून रोज मोठ्या प्रमाणात शहाळ्याची आवक होत आहे. ३० ते ४० रुपयांना शहाळे विकले जात होते. उखाड्यामुळे ही किंमत ५० ते ६० रुपये झाली आहे. शहाळ्यांची मागणी ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. ऊस व शहाळ्याप्रमाणे इतर फळांच्या रसालाही ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगड, संत्री, मोसंबी, डाळिंब, चिकू, अननस, लिंबू यांचीही आवक वाढली आहे. मार्केटमध्ये उपलब्ध असणारी कोल्ड्रिंक्स आरोग्यास घातक असल्याचे समोर येऊ लागले आहे. यामुळे नागरिकांनी ऊस, लिंबू व इतर फळांच्या रसाला सर्वाधिक पसंती देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शहरातील सर्वच रसवंतीगृहांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.
मुंबईत उसाच्या रसाला मागणी
प्राची सोनावणे ल्ल नवी मुंबई

नवरात्रीनिमित्त बाजारात फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. वाढत्या मागणीबरोबरच फळांच्या किमतीतही वाढ झाली आहे. दांडिया खेळून लागलेली पाण्याची तहान भागविण्यासाठी नागरिकांची ज्युस विक्रेत्यांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दीची लाट पाहायला मिळते. फळांच्या वाढत्या किमतीने शीतपेय विक्रेत्यांनीही दरात वाढ केल्याचे पाहायला मिळते. संत्री - मोसंबीचा एक ग्लास ज्युस ४० ते ५० रुपये, कलिंगड ज्युस ४० रुपये, चिकू मिल्कशेक ५५ रुपये, डाळिंबाचा ज्युस ५० रुपये, सफरचंद मिल्कशेक ६० रुपये, लिंबू सरबत १५ रुपये अशाप्रकारे शीतपेयांच्या दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळते. बर्फाच्या लादीच्या किमतीतही वाढ झाल्याची माहिती शीतपेय विक्रेत्यांनी दिली. १०० किलोची एक लादी २८० ते ३०० रुपयांना मिळत होती. वाढत्या मागणीमुळे या बर्फाच्या लादीची किंमत आता ३४० ते ३६० रुपयांपर्यंत वाढली आहे.
फळांचे दर : कलिंगड : ५० ते ६० रुपये किलो, खरबूज : ५० ते ५५ रुपये किलो, सफरचंद : १५० ते १८० रुपये किलो, मोसंबी : : ७० ते ७५ रुपये किलो, चिकू : ६० ते ७० रुपये किलो, संत्री : १५० ते १६० रुपये किलो, डाळिंब : १०० ते १५० रुपये किलो.
एपीएमसीतील ऊस व इतर फळांची आवक
वस्तूआवक (क्विंटल)भाव (किलो)
ऊस २,००० ते ३,०००
अननस १,०७०१० ते २६
चिकू१६०१५ ते ४८
डाळिंब५९६५० ते १२०
कलिंगड२,७३४१० ते १४
संत्री४,२२३१० ते ३२
मोसंबी ५,०८०१० ते ३२