दानवेंच्या पुतळ्याला सेनेकडून फाशी
By admin | Published: May 13, 2017 12:30 AM2017-05-13T00:30:51+5:302017-05-13T00:30:51+5:30
शेतकऱ्या बद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या भाजपा प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरु द्ध शिवसेना आक्र मक होऊन त्यांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : शेतकऱ्या बद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या भाजपा प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरु द्ध शिवसेना आक्र मक होऊन त्यांच्या पुतळला गुरूवारी दुपारी फाशीची शिक्षा दिली. नालासोपारा शिवसेना शहर शाखेने हे आंदोलन पुकारल होत.
दानवे यांनी एका सभेमध्ये शेतकरी कार्यकर्त्याने विचारलेल्या प्रश्नावर उद्धट उत्तर देतांना शेतकऱ्यांना कर्जा शिवाय काही दिसतच नाही. असे सांगून दानवे यांनी शेतकऱ्यांची टिंगल-टवाळी केली. या त्यांच्या वक्तव्याचा निषेध करणसाठी नालासोपारा शहर शिवसेना शाखेने ’ फाशी आंदोलन केले. दुपारी तुळींज शाखेजवळ दानवे याचं पुतळ्याला चपलांचा हार घालन्यात आला. त्यानंतर या पुतळयाला महिला कार्यकर्त्यांंनी चोप दिला. जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण याचं नेतृत्वाखाली केलेल या आंदोलनात विधानसभा संघटक प्रविण म्हाप्रळकर, शहरप्रमुख जितेंद्र शिंदे, संतोष टेंबवलकर, हेमंत पवार, संतोष टेंबवलकर, रवी मोरे, रविंद्र खामकर, नरेश जाधव, महिला आघाडी उपशहर प्रमुख रेशमा सावंत, वैशाली पालव, भारती गावडे, संगिता मालुसरे यांच्या सह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते. पैशाच जोरावर निवडणूका जिंकल्यानंतर भाजपा मंत्र्याना सत्तेचा माज चढला आहे. शेतकरी आत्महत्या करीत असताना, त्यांच्या बद्दल अपशब्द वापरून भाजपा सरकार आपला नालायकपणा सिद्ध करीत आहे. जनता त्याना पादळी तुडवल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रि या यावेळी शिरीष चव्हाण यांनी दिली.