नवी मुंबई : केंद्र शासनाने ५०० व १ हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभर सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. जनतेला वेठीस धरणाऱ्या या निर्णयाविरोधात काँगे्रसने कोपरखैरणेमध्ये निदर्शने केली. काँगे्रसचे नवी मुंबई अध्यक्ष दशरथ भगत, महिला अध्यक्षा पूजा धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसामध्ये नोटाबंदीमुळे विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसेल. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होतील असे सांगितले होते. पण प्रत्यक्षात सामान्य नागरिकांना स्वत:चेच पैसे बँकेतून काढतानाही तासनतास ताटकळावे लागत आहे. नागरिकांना वेठीस धरले असल्याच्या निशेधार्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून शासनाचा निशेध केला. आंदोलनामध्ये सुदर्शना कौशीक, निला लिमये, रूपाली कापसे, भारती आणारे, उज्वला साळवे, पक्षाच्या सर्व नगरसेवीका व पदाधिकारी उपस्थित होते.
नोटाबंदीविरोधात काँगे्रसची कोपरखैरणेमध्ये निदर्शने
By admin | Published: January 14, 2017 7:02 AM