उल्हासनगर : पावसाळ्यातील व्हायरल तापाच्या १५०० रुग्णांसह २५ डेंग्यू , मलेरिया ५२ तर ८ स्वाईन फलूच्या रूग्णाची नोंद पालिका दप्तरी झाल्याने शहरातील आरोग्य सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वाईनच्या रूग्णावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांचा रिपोर्ट पॉझिाटिव्ह आल्याची माहिती पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली. शहरात व्हायरल तापाची साथ पसरली असून दोन महिन्यात १५०० पेक्षा जास्त रूग्णाची नोंद झाली आहे. पालिका आरोग्य विभागाने आरोग्य केंद्रासह मध्यवर्ती व शासकिय प्रसूतीगृह रूग्णालयात औषधांचा साठा उपलब्ध करून दिला आहे. जंतूनाशकाची फवारणी सुरू केली असून जनजागृती साठी प्रसिद्धीपत्रके वाटली आहेत. तसेच आरोग्यकेंद्रात नागरिकांची तपासणी सुरू आहे. इंदिरा माखिजा, रिता लूथा, विमल मेश्राम, हिमांशू भवनानी,बबन थवकर, श्रृती दावडे, जानवी खटकर व आदीत्य गुप्ता यांना स्वाईन फलू झाला असून त्यांच्यावर विविध खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असून त्यांच्यावर पालिका लक्ष ठेवून असल्याची माहिती डॉ. रिजवानी यांनी दिली. (प्रतिनिधी)
डेंग्यूचे २५ तर स्वाईनचे ८ रूग्ण
By admin | Published: August 18, 2015 11:26 PM