जागतिक एलिफंटा लेणी परिसरात पुरातत्व विभागाचे स्वच्छता अभियान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 03:32 PM2023-10-18T15:32:48+5:302023-10-18T15:33:54+5:30
.या स्वच्छता अभियानामुळे लेणी परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत झाली असल्याची माहिती संरक्षक सहाय्यक कैलास शिंदे यांनी दिली.
मधुकर ठाकूर
उरण : स्वच्छता अभियानांतर्गत वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या एलिफंटा लेणी परिसरात भारतीय पुराततत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाने ग्रामस्थांच्या मदतीने बुधवारी (१८) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात लेणी परिसरातील सुमारे एक टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
भारतीय पुराततत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाचे अधिक्षक पुरातत्त्वविद डॉ. शुभ मजुमदार आणि एलिफंटा उप मंडळाचे संरक्षक सहाय्यक कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यामध्ये भारतीय पुराततत्व सर्वेक्षण विभागाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि सुमारे ४० ग्रामस्थ सहभागी झाले होते. लेण्याच्या प्रवेशद्वारापासून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात मुख्य लेणी आणि लेणी क्रमांक-२ आणि लेणी क्रमांक-३ परिसरातील स्वच्छता करण्यात आली.लेणी परिसरात पडलेल्या बिस्लेरी बॉटल, प्लास्टिक पिशव्या आणि केरकचरा
गोळा करून विल्हेवाट लावण्यात आली.या स्वच्छता अभियानामुळे लेणी परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत झाली असल्याची माहिती संरक्षक सहाय्यक कैलास शिंदे यांनी दिली.