शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जागतिक एलिफंटा लेणी परिसरात पुरातत्व विभागाचे स्वच्छता अभियान 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 3:32 PM

.या स्वच्छता अभियानामुळे लेणी परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत झाली असल्याची माहिती संरक्षक सहाय्यक कैलास शिंदे यांनी दिली.

मधुकर ठाकूर

उरण : स्वच्छता अभियानांतर्गत वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या एलिफंटा लेणी परिसरात भारतीय पुराततत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाने ग्रामस्थांच्या मदतीने बुधवारी (१८) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात लेणी परिसरातील सुमारे एक टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

भारतीय पुराततत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाचे अधिक्षक पुरातत्त्वविद डॉ. शुभ मजुमदार आणि एलिफंटा उप मंडळाचे संरक्षक सहाय्यक कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यामध्ये भारतीय पुराततत्व सर्वेक्षण विभागाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि सुमारे ४० ग्रामस्थ सहभागी झाले होते. लेण्याच्या प्रवेशद्वारापासून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात मुख्य लेणी आणि लेणी क्रमांक-२ आणि लेणी क्रमांक-३ परिसरातील स्वच्छता करण्यात आली.लेणी परिसरात पडलेल्या बिस्लेरी बॉटल, प्लास्टिक पिशव्या आणि केरकचरागोळा करून विल्हेवाट लावण्यात आली.या स्वच्छता अभियानामुळे लेणी परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत झाली असल्याची माहिती संरक्षक सहाय्यक कैलास शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण