जीटीपीएस अधिकारी मारहाण प्रकरणाची विभागीय चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 07:54 PM2023-06-20T19:54:36+5:302023-06-20T19:54:45+5:30
या कथित तक्रारीची दखल घेऊन तांत्रिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते.
मधुकर ठाकूर
उरण : येथील वायुविद्युत केंद्रात झालेल्या कथित मारहाण प्रकरणाची तांत्रिक विभागाचे मुख्य अभियंत्यांनी विभागीय चौकशीच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी दिली चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे.
उरण येथील वायुविद्युत केंद्रात कार्यकारी अभियंता संदेश कमटे यांना मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी अधिकाऱ्यांसमक्ष कानशिलात भडकावल्याची तक्रार वरिष्ठ अधिकारी तसेच सहसचिव सर्बोडिनेट इंजिनिअर असोसिएशन यांच्याकडे करण्यात आली होती.७ जुन २०२३ रोजी घडलेल्या कथित मारहाण प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी कार्यकारी अभियंता संदेश कमटे यांनी तक्रारीव्दारे केली होती.
या कथित तक्रारीची दखल घेऊन तांत्रिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते.या आदेशानंतर १९ जुन रोजी चौकशी पथकाने वायुविद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी केली असुन वरिष्ठांना चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुख्य अभियंता सुनील इंगळे यांच्याकडे विचारणा केली असता हे कथित प्रकरण आपल्या विरोधातील षडयंत्राचाच एक भाग आहे.चौकशी अहवालानंतर सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.