शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हयात नसलेल्या युवतीचा शोध आणि संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 12:14 AM

आक्रमक जमावाच्या दबावापोटी पोलिसांनी पंचाराम यांच्या सुसाइड नोटवरून पाच जणांना बेड्या ठोकल्या.

चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत राहणाऱ्या रिठाडिया कुटुंबातील मुलगी आरती हिने ३० मार्च रोजी घर सोडले ते कायमचेच. वडील पंचाराम यांच्या तक्रारीवरून नेहरुनगर पोलिसांनी आरती हरवल्याची नोंद दाखल करून घेत तपास सुरू केला. ८ महिने उलटले, तरीही मुलीचा काहीच थांगपत्ता न लागल्याने, पंचाराम यांनी टिळकनगर रेल्वे स्थानकात लोकलसमोर उडी घेत आपले आयुष्य संपविले. या घटनेने संतप्त झालेला रेगर समाज रस्त्यावर उतरला. पंचाराम यांच्या अंत्ययात्रेला हिंसक वळण लागले. ५ ते ६ हजारांच्या जमावाने जोरदार निदर्शने करत पोलिसांवर दगडफेक केली. त्यात ६ पोलीस गंभीर जखमी झाले.

आक्रमक जमावाच्या दबावापोटी पोलिसांनी पंचाराम यांच्या सुसाइड नोटवरून पाच जणांना बेड्या ठोकल्या. सीसीटीव्ही आणि संशयितांच्या चौकशीत गुरफटलेल्या स्थानिक पोलिसांकडून हा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष ६कडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांनी विशेष पथक नेमून तपासाला सुरुवात केली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, अर्चना कुदळे, सहायक उपनिरीक्षक सुरेश पवार, अंमलदार उज्ज्वल सावंत आणि सुनील पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक यांच्या पथकाने मुंबईसह ठाणे, नवी मुंबईच्या हद्दीपर्यंत तपासाची दिशा निश्चित केली.

या शोधाची सुरुवात आरती राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेज पडताळणीने झाली. त्यातून काहीच हाती न आल्याने आरती आणि तिच्या संपर्कात असलेल्यांचे सीडीआर काढले गेले. त्यात, आरतीने अखेरचा कॉल भागचंद फुलारिया (२३) या तरुणाला केल्याचे समजताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून काही हाती न आल्याने, मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांसह ठाणे, नवी मुंबईतील सर्व पोलीस ठाणी आणि रेल्वे पोलिसांकडील रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात झाली.

मुलीचा शोध घेणे आव्हान झाले होते. अखेर, तब्बल दहा महिन्यांनी म्हणजेच ३० जानेवारी, २०२० रोजी पोलीस पोलीस पथक सायन रुग्णालयातील अपघाती, तसेच बेवारस मृतदेहांची माहिती घेत असता, एका २२ वर्षीय बेवारस तरुणीचा तपशील त्यांच्या हाती लागला आणि तपासाची दिशाच बदलली.

३० मार्च, २0१९ रोजी त्या तरुणीने टिळकनगर स्थानकात लोकलसमोर उडी घेत आत्महत्या केली होती. गेले दहा महिने हयातच नसलेल्या व्यक्तीचा तिचे कुटुंबीय, पोलीस शोध घेत होते. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, एकमजली घराच्या पोटमाळ्यावरील खिडकीतून समोरच्या घरात राहणाºया भागचंदशी आरतीची नजरानजर झाली. ओढ वाढत गेली. चॅटिंग वाढत जाऊन एकमेकांचे मोबाइल क्रमांकही शेअर झाले. दोघांची गाठभेट होण्यापूर्वीच आरतीच्या लग्नासाठी घरात बोलणी सुरू झाली.

३० मार्चच्या सायंकाळी आरतीने भागचंदला कॉल करून त्याबाबत सांगितले. भागचंदने तिला घरचे सांगत असल्याप्रमाणे लग्न करण्याचा सल्ला दिला. दोघांचे ते संभाषण तिच्या बहिणीच्या कानावर पडले. बहिणीने तिला दटावत याबाबत आईबाबांना सांगण्याची धमकी दिली. तेव्हा ‘जे करायचे ते कर,’ असे म्हणत रागाच्या भरात आरतीने घर सोडले आणि तिने थेट रेल्वेतून उडी घेत आपले आयुष्य संपविले.ज्या मुलासाठी तिने आयुष्य संपविले, तो एका डोळ्याने अंध आहे. तो विवाहित असून त्याला मूलही आहे. मात्र, आरती त्याबाबत अनभिज्ञ होती. तो आरतीसमोर येण्यास घाबरत होता. आपल्या डोळ्याबाबत समजताच ती फेसबुकवर चॅटिंग सोडून देईल, म्हणून तो नेहमी तिच्याशी लांबूनच बोलत असे.

आरतीला पळवून नेल्याचा संशयावरून भागचंद मात्र अजूनही कारागृहातच आहे. रेल्वे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृतदेह सापडला, त्या दिवशी घटनास्थळावरील तिचे फोटो सर्व पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आले होते. मात्र, कुणाकडून काही प्रतिसाद न आल्याने आणि मुलीबाबत काहीच माहिती मिळाली नसल्याने बेवारसच्या यादीत तिच्या मृतदेहाचा समावेश झाला. तर शहर पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांना कुठलेही फोटो मिळाले नसल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे कोण खरे, कोण खोटे, हेही तितकेच गूढ आहे.मुलीच्या शोधासाठी दिवसरात्र एक केला. संपूर्ण युनिटच तिच्या शोधासाठी रवाना झाले. मात्र, दु:ख याचे आहे की, मुलीला वाचवू शकलो नाही. ती जिवंत सापडली असती, तर तपास सार्थकी लागला असता. मुलीच्या आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.- दीपक चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, कक्ष ६

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र