ड्रीम सिटीला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:03 PM2018-11-25T23:03:25+5:302018-11-25T23:04:59+5:30

तळोजा एमआयएडीसीमधील दूषित पाणी कोपरा खाडीत सोडले जाते.

Detection of pollution in Dream City | ड्रीम सिटीला प्रदूषणाचा विळखा

ड्रीम सिटीला प्रदूषणाचा विळखा

Next

पनवेल : खारघर हे सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पारसिक डोंगराच्या कप्यात, नैसर्गिक सानिध्यात वसलेल्या या शहरात सिडकोने अत्याधुनिक दर्जाचे प्रकल्प राबविले आहेत, त्यामुळे राहण्यास सुयोग्य शहर म्हणून सर्वाधिक खारघरला पसंती दिली जाते; परंतु दुर्दैवाने हा लौकिक टिकविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. कारण मागील काही दिवसांपासून शहराला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. उग्रवास, हवेतील धूलिकण आदीमुळे रहिवासी हैराण झाले आहेत. आरोग्यास घातक ठरणाऱ्या या प्रदूषणाच्या विरोधात खारघरवासीयांनी संघर्ष सुरू केला आहे.


तळोजा एमआयएडीसीमधील दूषित पाणी कोपरा खाडीत सोडले जाते. या दूषित पाण्यामुळे पाणीप्रदूषण तर होतेच, शिवाय रात्रीच्या वेळेला उग्र वास येत आहे. हवेत धूलिकण वाढल्याने दिवसाही श्वास घेताना त्रास होत आहे. ही परिस्थिती मागील अनेक दिवसांपासून असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात अनेकांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. सिडकोसह पनवेल महापालिकेलाही या संदर्भात वेळोवेळी माहिती देण्यात आली. तळोजा येथील प्रदूषणकारी कारखान्यांमुळे ही समस्या उद्भवल्याचे स्पष्ट झाले आहे. ही वस्तुस्थिती समोर असतानाही संबंधित प्राधिकरणांकडून या संदर्भात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या खारघरवासीयांनी रविवारी सिडको, एमआयडीसी तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या विरोधात मोर्चा काढून निषेध नोंदविला. खारघर कॉलनी फोरमच्या माध्यमातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी आपल्या हातातून बनविलेल्या संदेशात्मक फलकांच्या द्वारे होणाºया त्रासाची माहिती दिली. अबालवृद्धांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. खारघरमधील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता, पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्र ांत पाटील, महिला व बाल कल्याण सभापती रीना गरड, तळोजामधील प्रदूषणासंदर्भात हरित लवादामध्ये धाव घेतलेले नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, अर्जुन गरड, बालेश भोजणे, संतोष तांबोळी, अमर उपाध्याय आदीसह हजारो रहिवासी यात सहभागी झाले होते.


शहरातील प्रदूषणावर वेळीच कार्यवाही झाली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी या वेळी दिला. तसेच या प्रदूषणामुळे होणाºया दुष्परिणामाची त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. विशेष म्हणजे, हरित लवादानेही येथील प्रदूषणासंदर्भात एमआयडीसी, तसेच संबंधित यंत्रणेला दोषी ठरविले आहे. ही वस्तुस्थिती असतानाही संबंधितांवर कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी
व्यक्त केली. रहिवाशांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबविला नाहीत, तर भविष्यात ही समस्या आणखी तीव्र होईल, असा इशारा नगरसेविका रीना गरड यांनी दिला.

माकडांच्या शिल्पावर उपहासात्मक टीका
खारघर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ हिरानंदानी उड्डाणपुलाजवळ सिडकोने तीन माकडांचे शिल्प उभारले आहे. नागरिकांना संदेश देणाºया तीन माकडांच्या मागे उपहासात्मक तीन माकडांचे बॅनर्स रहिवाशांनी तयार केले होते.
या तीन माकडांमध्ये एमआयडीसी, सिडको व एमपीसीबी यांची नावे देण्यात आली होती. काहीही न करता ही तीन माकडे मूग गिळून गप्प बसल्याची उपहासात्मक टीका या वेळी करण्यात आली.

Web Title: Detection of pollution in Dream City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.