घरफोडी करणाऱ्या चौकडीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 03:45 AM2018-12-29T03:45:54+5:302018-12-29T03:46:03+5:30
घरफोडीसह रेल्वेतून लॅपटॉप चोरी करणाºया चौकडीला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यामधील तीन लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
नवी मुंबई - घरफोडीसह रेल्वेतून लॅपटॉप चोरी करणाºया चौकडीला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यामधील तीन लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
हितेश सिंग (२२), राहुल कांबळे (२६), मोईनुल खान (२७) व अभिजीत कांबळे (२०) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. ते कोपरखैरणे व सानपाडा परिसरात राहणारे आहेत. सराईत गुन्हेगारांची टोळी परिसरात वावरत असल्याची माहिती कोपरखैरणे पोलीसठाण्याचे सहायक निरीक्षक जी. डी. देवडे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली देवडे यांच्यासह पोलीस नाईक सतीश वाघमोडे, संदीप निकम, सूरज बाविस्कर, प्रसाद काजळे, नितीन पाटील व अमृत साळी आदीचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी कोपरखैरणे परिसरात सापळा रचून चौघांना अटक केली. अटक केलेले चौघेही सराईत गुन्हेगार असून, ते घरफोडीच्या गुन्ह्यासह रेल्वेत प्रवाशांचे लॅपटॉप चोरी करायचे. या टोळीला अटक केल्यानंतर चौकशीत त्यांनी सहा गुन्ह्यांची कबुली दिल्याचे सहायक निरीक्षक जी. डी. देवडे यांनी सांगितले. त्यामध्ये कोपरखैरणे परिसरातील घरफोडीचे पाच तर नेरुळमधील दुचाकीचोरीच्या एका गुन्ह्याचा समावेश आहे. शिवाय, त्यांच्याकडून चोरीचे आठ लॅपटॉप, चार तोळे सोन्याचे दागिने व एक मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे. जप्त लॅपटॉपची ओळख पटवण्यासाठी संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचेही आवाहन पोलिसांनी केले आहे.