दरोड्यातील संशयित महिलेला अटक, मुख्य सूत्रधाराच्या अटकेसाठी पोलिसांचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 04:53 AM2017-10-31T04:53:04+5:302017-10-31T04:53:15+5:30
वाशीतील व्यापा-याच्या घरी दरोडा टाकून पळालेल्या टोळीतील संशयित महिलेला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर गुन्ह्याच्या मुख्य सूत्रधाराच्या अटकेसाठी नवी मुंबई पोलिसांचे एक पथक राज्याबाहेर सापळा रचून आहे.
नवी मुंबई : वाशीतील व्यापा-याच्या घरी दरोडा टाकून पळालेल्या टोळीतील संशयित महिलेला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर गुन्ह्याच्या मुख्य सूत्रधाराच्या अटकेसाठी नवी मुंबई पोलिसांचे एक पथक राज्याबाहेर सापळा रचून आहे. यामुळे लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
वाशी येथे राहणा-या अरुण मेनकुदळे यांच्या घरी दरोडा टाकणाºया टोळीतील संशयित महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही महिला खारघर परिसरात लपलेली असताना, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांंनी तिला पकडल्याचे सूत्रांकडून समजते. हीच महिला मेनकुदळे यांच्या कुटुंबावर ओळखीच्या व्यक्तींमार्फत पाळत ठेवून होती असेही समजते. मात्र त्यांनी लुटलेला ऐवज व इतर साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यानुसार परिमंडळ एकचे पोलीस व गुन्हे शाखा यांच्यामार्फत संयुक्त तपास पथके तयार करण्यात आली आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयित महिलेकडून तिच्या काही साथीदारांविषयीची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. यानुसार त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे एक पथक राज्याबाहेर सापळा लावून असल्याचेही पोलीस सूत्रांकडून समजले.