नवी मुंबई : प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्तरावर विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. गुरु वार, २६ सप्टेंबर रोजी नवी मुंबई शहरातील शाळांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती, यामध्ये महापालिका तसेच खासगी अशा ३०० हून अधिक शाळांतील ६० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक प्रतिबंधाविषयी भावना व्यक्त केल्या.प्लॅस्टिकचे हजारो वर्षे विघटन होत नसल्यामुळे वातावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून प्लॅस्टिक हा पर्यावरणाचा आणि मानवी जीवनासह संपूर्ण जीवसृष्टीचा सर्वात मोठा हानिकारक शत्रू आहे. सदर बाब लक्षात घेऊन देशस्तरावर प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक व्यापक मोहीम स्वच्छ भारत मिशनच्या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा या राष्ट्रव्यापी मोहिमेअंतर्गत हाती घेण्यात आली आहे. मोहीम यशस्वी होण्यासाठी मोहिमेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ११ सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत लोकसहभागातून विविध उपक्र म हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थी या संवेदनशील घटकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.बुधवारी नवी मुंबई शहरातील एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वच्छ व प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबईचा व्यापक जागर केल्यानंतर गुरु वारी शहरातील महानगरपालिका तसेच खासगी अशा ३०० हून अधिक शाळांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेत सुमारे ६० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.नवी मुंबई शहर स्वच्छ व प्लॅस्टिकमुक्त ठेवणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असून, शहरातील मुलांवर विद्यार्थीदशेपासूनच स्वच्छतेचा संस्कार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला अशा अंगभूत कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्र मांच्या माध्यमातून नवी मुंबईतील विद्यार्थीमनावर स्वच्छतेचे संस्कार केले जात आहेत. या उपक्र मांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता समाधान वाटते, शहरातील उद्याची पिढीही भविष्यातील स्वच्छ व प्लॅस्टिकमुक्त शहराचा आधार असेल, असा विश्वास आहे.- अण्णासाहेब मिसाळ, महापालिका आयुक्त
प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबईचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:25 PM