शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

जिल्ह्याच्या विकासाची गाडी धावणार वेगाने

By admin | Published: February 03, 2016 2:20 AM

रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता १५१ कोटी ३६ लाख रुपयांच्या वित्तीय आराखड्याला मंजुरी मिळाली आहे

अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता १५१ कोटी ३६ लाख रुपयांच्या वित्तीय आराखड्याला मंजुरी मिळाली आहे; तर ४० कोटी ७८ लाख रुपयांच्या वाढीव मागणीला वित्त मंत्रालयाने तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी दिली. एवढ्या मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आर्थिक पाठबळ प्राप्त झाल्याने जिल्ह्यात विकासाची गाडी वेगाने धावणार आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता हाच आकडा १४९ कोटी ४९ लाख रुपये इतका होता. २०१६-१७ मध्ये त्यामध्ये एक कोटी ८७ लाख रुपयांची अधिक भर पडली आहे. १४९ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीपैकी १२० कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित ३० कोटी रुपयांच्या निधीचे वितरण येत्या चार दिवसांत करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी २५ कोटी रुपये देण्यात आले असून, रस्त्यांसाठी १८ कोटी रुपये, जलयुक्त शिवारासाठी २१ कोटी रुपये, वन विभाग १३ कोटी, साकव बांधणी १० कोटी, नगरोत्थान ९ कोटी, आरोग्य सुविधा सात कोटी, जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते पाच कोटी, मत्स्यव्यवसाय चार कोटी ५० लाख, शिष्यवृत्ती ४ कोटी, पशुसंवर्धन आणि अंगणवाड्यांसाठी प्रत्येकी ३ कोटी, क्रीडा विभागासाठी दीड कोटी रुपये यांसह अन्य कामांसाठी असा १२० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.२५ जानेवारीला जिल्हा नियोजन समितीच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी घेतला होता. संबंधितांनी ३१ मार्चपर्यंत आपापला निधी खर्च करावा. खर्च न करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी तेली-उगले यांनी यावेळी दिला होता, असेही जाधव यांनी सांगितले. २०१६-१७ या आर्थिक वर्षांसाठी १५१ कोटी ३६ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून वाढीव मागणीही करण्यात आली होती. याबाबतची बैठक १ फेब्रुवारीला मंत्रालयात पार पडली होती. (प्रतिनिधी)