गवळीदेव डोंगराचा विकास कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:51 AM2018-10-15T00:51:46+5:302018-10-15T00:52:02+5:30

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील एकमेव निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गवळीदेव डोंगर परिसराचा विकास गेल्या ...

The development of the mountain of GawalDev on paper | गवळीदेव डोंगराचा विकास कागदावरच

गवळीदेव डोंगराचा विकास कागदावरच

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील एकमेव निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गवळीदेव डोंगर परिसराचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच होत आहे. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तिथल्या निसर्ग संपत्तीचा ºहास होत चालला आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली खर्च होणारा निधी नेमका जातो कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे.


एकविसाव्या शतकातले शहर म्हणून नवी मुंबईचा विकास करताना शहरालगतच्या नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत आहे. यामुळे पारसिक हिलवर झाडांऐवजी सिमेंटचे जंगल तयार झाले आहे, तर गवळीदेव डोंगर परिसर अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. ट्रेकिंगची अथवा निसर्ग भ्रमंतीची आवड असणाऱ्यांसाठी गवळीदेव परिसर हा शहरालगतचा एकमेव पर्याय आहे; परंतु अनेक वर्षांपासून सदर परिसराचा विकास केवळ कागदावरच होत असल्याने निसर्गप्रेमींची घोर निराशा होत आहे. वनखात्याच्या ताब्यात असलेला हा डोंगरभाग पालिकेने संवर्धनासाठी स्वत:च्या ताब्यात देखील मागितला होता. परंतु तो देण्यास नाकारल्याने पालिकेने वनखात्याला निधी देऊन त्याठिकाणी उत्तम दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले होते. त्यानुसार वनखात्याला निधी देण्याचा प्रस्ताव देखील महासभेत मंजूर झालेला आहे. त्याद्वारे धबधब्याचा परिसर व गवळीदेव मंदिराकडे जाणाºया मार्गावरील पायºया, शौचालये, बैठक व्यवस्था यासह नव्या वृक्षांची लागवड केली जाणार होती. प्रत्यक्षात मात्र त्यापैकी कसलीही ठोस सुविधा त्याठिकाणी नसल्याने निसर्गप्रेमींना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.


रोजच्या धकाधकीच्या जीवनात क्षणभर विरंगुळ्याच्या शोधात अनेक जण मित्रमंडळींसह अथवा सहकुटुंब गवळीदेव परिसराला भेट देतात. पावसाळ्यात तर धबधब्याच्या आकर्षणामुळे त्याठिकाणी पर्यटकांचा लोंढा येत असतो. या वेळी पर्यटनाच्या नावाखाली चालणाºया दारूच्या पार्ट्यांना व त्यानंतरच्या संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त लावला जातो. मात्र, पावसाळा संपताच संबंधित सर्वच प्रशासनाला पुढच्या पावसाळ्यापर्यंत या ठिकाणाचा विसर पडत असल्याचे पावलोपावली दिसून येत आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी कसलीही ठोस सुविधा त्याठिकाणी नसल्याने निसर्ग भ्रमंतीसाठी येणाºयांची घोर निराशा होत असून, त्यांना गैरसोयीला देखील सामोरे जावे लागत आहे.


दोन ठिकाणी सार्वजनिक शौचालये असून, त्यांचीही मोडतोड झालेली आहे. तर बैठकीसाठी बनवलेल्या लाकडी शेडची मोडतोड करून त्याचे भाग चोरीला गेल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. पावसाळ्यात जोराच्या वाऱ्याने पायवाटांवर आडवी कोसळलेली झाडे अद्याप हटवली नाहीत. त्यामुळे गवळीदेव डोंगर परिसर हे केवळ पावसाळी पर्यटनस्थळ नसून त्याचा कायमस्वरूपी पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

Web Title: The development of the mountain of GawalDev on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.