शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

शहरात विकासाची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 1:18 AM

४०० कोटींचे प्रस्ताव; उड्डाणपूल, रस्ते, पदपथासह पादचारी पुलांचाही समावेश

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने शहर विकासाच्या कामांना गती देण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहर गतिशील योजनेसह ५४ प्रस्तावांचा समावेश करण्यात आला आहे. तीन वर्षांमध्ये प्रथमच एका सभेमध्ये ४०० कोटी रुपये खर्चाचे ठराव मंजुरीसाठी आले असून, यामध्ये उड्डाणपूल, रस्ते, पदपथांसह पादचारी पुलांचाही समावेश आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर विकासकामे होत नसल्याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांनी वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्या वर्षी निधी नसल्यामुळे विकासकामे झाली नाहीत. त्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या भांडणामुळे अपेक्षित गतीने कामे होऊ शकली नाहीत. डॉ. रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उत्पन्नवाढीवर लक्ष केंद्रित केले. पालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी करण्यात प्रशासनाने यश मिळविले. ठेवी वाढल्या; परंतु विकासकामे होत नसल्यामुळे स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक स्पष्ट नाराजी व्यक्त करत होते. आयुक्त रामास्वामी एन. यांनी दोन वर्षे शहराचा अभ्यास करून विकासाला गती देण्यास सुरुवात केली आहे. शहर गतिशीलता योजना तयार केली असून, त्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल, पादचारी भुयारी मार्ग व जलमार्गाचाही समावेश आहे. जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्येही तब्बल ४०० कोटी रुपये किमतीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तीन वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच प्रस्ताव आले असल्यामुळे नगरसेवकांनीही समाधान व्यक्त केले आहे.ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे नाका येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी वारंवार केली होती. प्रशासनाने या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यासाठी २४ कोटी ७६ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे पाठविण्यात आला आहे. घणसोली नोड हस्तांतर झाल्यानंतर तेथील विकासकामांनाही गती देण्यास सुरुवात केली असून, रस्ते, पदपथ निर्मितीसाठी १२ कोटी ६५ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पार्किंगचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेलापूर सेक्टर-१५ मध्ये वाहनतळ विकसित करण्यासाठी २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. महापालिकेमधील कंत्राटी कामगारांना वेतनामधील फरकाचे ७० कोटी रुपये देण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना गणवेश मिळणारमहानगरपालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून गणवेश मिळालेले नाहीत. पहिला गणवेश खरेदी करा व नंतर अनुदान देण्याच्या पद्धतीमुळे हजारो विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागले होते. या वर्षी पुन्हा पूर्ववत महानगरपालिका गणवेशपुरवठा करणार आहे. तब्बल ४१४५३ विद्यार्थ्यांना गणवेश, पी.टी. व स्काउट गाइडचा गणवेश दिला जाणार असून, त्यासाठी आठ कोटी ११ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.पादचारी पुलांचाही समावेशमहानगरपालिका नेरुळ सेक्टर-२१, ठाणे-बेलापूर रोडवर पावणे, कोपरखैरणे डी-मार्टजवळ पादचारी पूल बांधणार असून, त्याविषयी प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आले आहेत.शहरात एलईडी दिवेमहानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. ईईएसएलच्या माध्यमातून जवळपास ४८ कोटी रुपये खर्च करून पूर्ण शहरात एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. यामुळे वीजबिलांमध्ये बचत होणार असून, महापालिकेने संबंधित कंपनीला सात वर्षांमध्ये १०६ कोटी रुपये टप्प्याटप्प्याने देण्याचा प्रस्तावही सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला आहे.विषय आणि खर्चतुर्भे रेल्वस्थानकासमोर उड्डाणपूल बांधणे - २४ कोटी ७६ लाखविद्यार्थ्यांना गणवेश वाटप - ८ कोटी ११ लाखकंत्राटी कामगारांना किमान वेतनाचा फरक देणे - ७० कोटीनेरुळ सेक्टर-२१ मध्ये पादचारी भुयारीमार्ग - १ कोटी ६४ लाखउद्यानांच्या देखभालीसाठी कंत्राटदार नियुक्त करणे - ३५ कोटी ३७ लाखपहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार - ३१ कोटी ४२ लाखनेरुळ सेक्टर १५ मधील फकिरा मंडईचा विकास - ५६ लाख ७८ हजारघणसोलीमध्ये रस्ते पदपथ निर्मिती - १२ कोटी ६५ लाखवाशी सेक्टर-१५, १६ मध्ये गटार बांधणे - ७ कोटी ७४ लाखमनपा क्षेत्रामध्ये एलईडी दिवे बसविणे - १०६ कोटी ८३ लाखबेलापूर सेक्टर-१५ मध्ये बहुमजली वाहनतळ विकसित करणे - २७ कोटी ६६ लाखकोपरी गावामध्ये अंगणवाडी, बालवाडीसह बहुउद्देशीय इमारत - ३ कोटी २९ लाखकोपरखैरणे डी-मार्टजवळ पादचारी पूल बांधणे - ८ कोटी ४० लाखपावणे पुलाजवळ पूल बांधणे - २ कोटी ५२ लाखकोपरखैरणेमध्ये वीजवाहिनी भूमिगत करणे - ४ कोटी ९ लाखदिघा, कोपरखैरणेमधील गंजलेले खांब बदलणे - ३ कोटी ९५ लाखनेरुळ सेक्टर-२६ मध्ये संरक्षण भिंत बांधणे - ९८ लाख १७ हजारकोपरखैरणे सेक्टर-२३ मध्ये शाळेची नवीन इमारत बांधणे - १० कोटी ६७ लाख 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका