पावसाळ्यापुर्वी अतिक्रमणविरोधात धडक मोहीम; उड्डाणपुलाखालील झोपड्या हटविल्या
By नामदेव मोरे | Published: May 27, 2024 06:23 PM2024-05-27T18:23:37+5:302024-05-27T18:23:48+5:30
कोपरखैरणेत इमारतीवर हातोडा
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम सुरू केली आहे. सीबीडी मधील उड्डाणपुलाखाली उभारलेल्या ४८ झोपड्या हटविण्यात आल्या. कोपरखैरणेमध्ये विनापरवानगी बांधण्यात आलेल्या इमारतीवरही हातोडा चालविण्यात आला.
शहरातील उड्डाणपुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेवर अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. काही ठिकाणी झोपड्या व काही ठिकाणी व्यवसायीक वापरही केला जात आहे. पुलांच्या सुरक्षेला यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पुलांखाली झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. सीबीडीमध्ये दिवसभर मोहीम राबवून ४८ झाेपड्या हटवून उड्डाणपुलाखालील परिसर अतिक्रमणमुक्त केला. विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली मयुरेश पवार, स्वप्निल तारमळे, नयन भोईर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कोपरखैरणे सेक्टर ५ मध्ये बजरंग गोळे यांनी रूम नंबर ३३५ च्या जागेवन अनधिकृतपणे बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. रुम नंबर १२२ च्या जागेवर कारभारी ढोले यांनी इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. या दोन्ही बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.