बँक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:23 AM2019-09-22T00:23:39+5:302019-09-22T00:23:50+5:30
नवी मुंबई : ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन आणि बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ...
नवी मुंबई : ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन आणि बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी देशभरात आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी बँकेच्या ठाणे विभागीय कार्यालयासमोर नवी मुंबईसह, पनवेल विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी निदर्शने केली.
संघटनेचे जनरल सेक्रेटरी नागेश नाचणकर यांनी आपल्या भाषणातून आंदोलनाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच कर्मचाºयांच्या विविध मागण्यांचा ऊहापोह केला, तर संघटनेचे सचिव अरविंद मोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अधिकारी संघटनेचे सचिव व्ही. विश्वनाथन, महिला प्रतिनिधी रूपाली जांभेकर, गीता वर्दम व हर्ष वैती आदींची भाषणे झाली. त्यानंतर ठाणे विभागाचे क्षेत्रीय प्रबंधकांना संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष किशोर सावंत, उपाध्यक्ष संतोष जगताप, सुधीर पाटील, सदानंद पेडणेकर, कोषाध्यक्ष पांडुरंग भोगले, सतीश नाईक, जॉइंट सेक्रेटरी रविकांत गांजबे, बाबू जाधव, शुभांगी देसाई, गोपीचंद पाटेकर आदी उपस्थित होते.