सखी महोत्सवात विविध स्पर्धांची धूम
By admin | Published: April 24, 2017 02:23 AM2017-04-24T02:23:08+5:302017-04-24T02:23:08+5:30
लोकमत सखी मंच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले एक असे व्यासपीठ ज्या व्यासपीठावरून आज ती मुक्तपणे बागडू लागली आहे.
नवी मुंबई : लोकमत सखी मंच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले एक असे व्यासपीठ ज्या व्यासपीठावरून आज ती मुक्तपणे बागडू लागली आहे.
आत्मविश्वासाच्या पंखावर कर्तव्याचे ओझे सांभाळत मुक्तपणे झेप घेवू लागली आहे. या व्यासपीठावरून फक्त शहर विभागातील महिलाच नाही तर ग्रामीण भागातील महिलासुद्धा गगनभरारी घेवू लागल्या आहेत. त्यांच्यातील कलेला, प्रतिभेला वाव देण्यासाठी पुन्हा एकदा जिल्हास्तरीय सखी महोत्सव २०१७ चे आयोजन म्हणजे कलाविष्काराचा अभूतपूर्व सोहळा!
लोकमत सखी मंच आयोजित पॉवर्ड बाय बिर्ला सनलाईफ इंशुरन्स सखी महोत्सव २०१७ म्हणजे विविध स्पर्धांनी नटलेला उत्सव ज्यात एकल नृत्य स्पर्धा, मेहंदी आणि वेशभूषा स्पर्धा (विषय विविध प्रातिंय नववधू), पाक कला (कैरी घालून केलेला तिखट किंवा गोड पदार्थ घरून बनवून आणणे) अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
एकल नृत्य स्पर्धेसाठी ५ मिनिटे वेळ (सीडी/ पेनड्राईव्ह सोबत आणणे). वेशभूषा स्पर्धेसाठी ३० सेकंदाचा वेळ दिला जाईल. मेहंदी स्पर्धेसाठी एका सखीने दुसऱ्या सखीच्या हातावर मेहंदी काढावी. एकूणच भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन आणि सादरीकरण या महोत्सवाच्या निमित्ताने होणार असून सखींच्या कलाविष्काराची मुक्त उधळण बघायला मिळणार आहे. प्रत्येक स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळणार असून केवळ मनोरंजनावरच भर देण्यात आला नसून स्त्रियांचे आर्थिक नियोजन देखील व्यवस्थितरीत्या व्हावे यासाठी खास करून महिलांसाठी बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सच्या वतीने ‘स्वाभिमान’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्यात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कसे मिळवावे या संदर्भात बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सचे प्रतिनिधी मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी खास लकी ड्रॉचे आयोजन केले असून आकर्षक पुरस्कार जिंकण्याची संधी मिळणार आहे. या आगळ्यावेगळ्या सखी महोत्सवात सहभागी व्हा आणि जिंका भरपूर बक्षिसे.