शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

सखी महोत्सवात विविध स्पर्धांची धूम

By admin | Published: April 21, 2017 12:27 AM

लोकमत सखी मंच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले एक असे व्यासपीठ ज्या व्यासपीठावरून आज ती मुक्तपणे बागडू लागली आहे.

नवी मुंबई : लोकमत सखी मंच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले एक असे व्यासपीठ ज्या व्यासपीठावरून आज ती मुक्तपणे बागडू लागली आहे. आत्मविश्वासाच्या पंखावर कर्तव्याचे ओझे सांभाळत मुक्तपणे झेप घेवू लागली आहे. या व्यासपीठावरून फक्त शहर विभागातील महिलाच नाही तर ग्रामीण भागातील महिलासुद्धा गगनभरारी घेवू लागल्या आहेत. त्यांच्यातील कलेला, प्रतिभेला वाव देण्यासाठी पुन्हा एकदा जिल्हास्तरीय सखी महोत्सव २०१७ चे आयोजन म्हणजे कलाविष्काराचा अभूतपूर्व सोहळा!लोकमत सखी मंच आयोजित पॉवर्ड बाय बिर्ला सनलाईफ इंशुरन्स सखी महोत्सव २०१७ म्हणजे विविध स्पर्धांनी नटलेला उत्सव ज्यात एकल नृत्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, ब्रायडल मेकअप, मेहंदी आणि वेशभूषा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. एकल नृत्य स्पर्धेसाठी ५ मिनिटे वेळ (सीडी/ पेनड्राईव्ह सोबत आणणे). ब्रायडल मेकअपसाठी वेळ अर्धा तास, मेकअपसाठी मॉडेल स्वत:ची आणणे. वेशभूषा स्पर्धेसाठी ३० सेकंदाचा वेळ दिला जाईल. मेहंदी स्पर्धेसाठी एका सखीने दुसऱ्या सखीच्या हातावर मेहंदी काढावी. एकूणच भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन आणि सादरीकरण या महोत्सवाच्या निमित्ताने होणार असून सखींच्या कलाविष्काराची मुक्त उधळण बघायला मिळणार आहे. प्रत्येक स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळणार असून केवळ मनोरंजनावरच भर देण्यात आला नसून स्त्रियांचे आर्थिक नियोजन देखील व्यवस्थितरीत्या व्हावे यासाठी खास करून महिलांसाठी बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सच्या वतीने ‘स्वाभिमान’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्यात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कसे मिळवावे या संदर्भात बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सचे प्रतिनिधी मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी खास लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून आकर्षक पुरस्कार जिंकण्याची संधी मिळणार आहे. या आगळ्यावेगळ्या सखी महोत्सवात सहभागी व्हा आणि जिंका भरपूर बक्षिसे.