लाल दिवे काढल्याने परिवर्तन झाले काय? -मुंढे

By Admin | Published: May 2, 2017 03:20 AM2017-05-02T03:20:13+5:302017-05-02T03:20:13+5:30

भाजपाची सत्ता आल्यानंतर केवळ तीन वर्षांत तूरडाळ, सिलिंडर, पेट्रोल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत

Did the red light make changes? -Munts | लाल दिवे काढल्याने परिवर्तन झाले काय? -मुंढे

लाल दिवे काढल्याने परिवर्तन झाले काय? -मुंढे

googlenewsNext

रोहा : भाजपाची सत्ता आल्यानंतर केवळ तीन वर्षांत तूरडाळ, सिलिंडर, पेट्रोल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. असे सांगत नोटाबंदी आणि लाल दिवे काढल्याने देशात खरोखरच परिवर्तन झाले काय? ‘अच्छे दिन’ आले काय? असा प्रश्न उपस्थित करून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी भाजपा सरकारचा समाचार घेतला. रोहा येथे राष्ट्रवादी, नगरपरिषदेच्या वतीने आयोजित राजिप अध्यक्षा अदिती तटकरे व जि. प. सदस्य, पं.स. सभापती,उपसभापती सदस्यांचा सत्कार मुंढे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.

Web Title: Did the red light make changes? -Munts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.