शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

सेनेतील मतभेद चव्हाट्यावर, पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 02:32 IST

पक्षाच्या गटनेत्यांनी राजीनाम्याचे पत्र खरे असून, नवीन सदस्याचे नाव पुढील सभेत निश्चित केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई : विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. चौगुले यांनी राजीनामा दिला नसल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. पक्षाच्या गटनेत्यांनी राजीनाम्याचे पत्र खरे असून, नवीन सदस्याचे नाव पुढील सभेत निश्चित केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. पालिका सभागृहात पक्षातील मतभेद उघडकीस आले असून, पक्षात फूट पडणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.महापौर निवडणुकीदरम्यान पालिकेवर भगवा फडकवण्याचा दावा शिवसेनेने केला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांमधील गटबाजी थांबविण्यात तात्पुरते यश मिळविले होते; परंतु निवडणूक होताच गटबाजी पुन्हा सुरू झाली आहे. ३ जानेवारीला विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी वैयक्तिक कारणास्तव स्थायी समितीचा राजीनामा दिल्याचे पत्र पक्षाचे गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी महापौरांकडे दिले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. विजय चौगुले यांनी सचिवांना पत्र देऊन मी राजीनामा दिलेला नाही. राजीनामा पत्रावरील सही माझी नसल्याचा दावा केला होता. यानंतरही त्यांचा राजीनामा मंजूर करून नवीन सदस्य निवडीसाठीचा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडला. महासभा सुरू होताच विजय चौगुले यांचे समर्थक मनोज हळदणकर, बहादूर बिष्ठ व जगदीश गवते यांनी चौगुले यांनी राजीनामा दिलेला नसल्याने तो मंजूर करू नये, अशी मागणी केली. भविष्यात कोणीही कोणाचा राजीनामा सादर करेल व चुकीची प्रथा पडेल, यामुळे या विषयी काहीही निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली.विजय चौगुले यांचे समर्थक सभागृहात आक्रमक झाले होते; परंतु त्यांचा दावा पक्षाचे गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी खोडून काढला. शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे.पक्षातील कोणताही राजीनामा पदाधिकारी प्रथम पक्षाचे नेते किंवा स्थानिक गटनेत्यांकडे सादर करतात. त्याप्रमाणे हाही राजीनामा सादर करण्यात आला आहे. याविषयी जी काही चौकशी करायची असेल ती करावी; पण प्रथम राजीनामा मंजूर करावा. नवीन सदस्याचे नाव निश्चित झालेले नाही. पुढील सभेमध्ये सदस्याचे नाव दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.महापौर जयवंत सुतार यांनीही चौगुले गटाचा दावा खोडून काढला. राजीनामा नियमाप्रमाणे मंजूर करण्यात आलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, नवीन सदस्याची निवड पुढील बैठकीत होणार असल्याचे सांगितले.राष्ट्रवादीऐवजीसेनेतच फूटमहापौर निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँगे्रसमध्येफूट पाडून महापौरपद मिळविण्याचा निर्धार शिवसेनेने केला होता. राष्ट्रवादीचे जवळपास १२ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला होता. काँगे्रसच्या मदतीने महापौरपद मिळविण्यात येणार होते; परंतु महापौर निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्येच उभी फूट पडली. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंड पुकारले होते. काँगे्रसमधील मतभेद व भाजपाने केलेल्या असहकार्यामुळे शिवसेनेचे स्वप्न धुळीस मिळाले व राष्ट्रवादीचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नाहीच; परंतु महापौर निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मतभेद वाढले व पक्षातच उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने राष्ट्रवादीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.चौगुले यांची अनुपस्थितीसर्वसाधारण सभेमध्ये चौगुले यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले होते; परंतु या सभेमध्ये विजय चौगुले, त्यांचे चिरंजीव ममीत चौगुले उपस्थित नव्हते. जवळपास १५ दिवस शहरात या विषयावर चर्चा सुरू असून, अद्याप त्यांनी काहीही भूमिका स्पष्ट केलेली नसून ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विजय चौगुले यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिलेला नाही. याविषयी त्यांनी स्वत: सचिव विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. राजीनाम्याचे जे पत्र सादर करण्यात आले आहे, त्यावर त्यांची सही नसल्याने तो मंजूर केला जाऊ नये.- मनोज हळदणकर,शिवसेना नगरसेवकशिवसेनेत पदाधिकारी नेत्यांकडे किंव गटनेत्यांकडे त्यांचा राजीनामा सादर करतात. त्याप्रमाणे चौगुले यांनी राजीनामा दिला होता. गटनेता म्हणून तो पुढील कार्यवाहीसाठी महापौरांकडे देण्यात आला. राजीनामा मंजूर करण्यात यावा. नवीन सदस्याचे नाव अद्याप निश्चित केलेले नसून पुढील सभेत ते सादर केले जाईल.- द्वारकानाथ भोईर,गटनेते, शिवसेनातिघांनीच घेतली बाजूनवी मुंबई शिवसेनेत विजय चौगुले व विजय नाहटा यांचे दोन गट झाले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांनीही नाहटा गटाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. यामुळे सभागृहातही विजय चौगुले यांची तिघांनीच बाजू घेतली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना