ऑनलाइनद्वारे शिक्षण व्यवस्थेची डिजिटल वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:35 AM2020-07-02T04:35:46+5:302020-07-02T04:35:59+5:30
शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत
योगेश पिंगळे
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्यक्षात शाळा सुरु झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षा$चे नुकसान टाळण्यासाठी डिजिटल शिक्षण पद्धतीची अवलंब केला जात आहे. परंतु नवी मुंबई शहरातील पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे डिजिटल शिक्षण घेण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे सुविधा उपलब्ध नसलेले अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत.
कोरोना विषाणूंच्या परिस्थितीमध्ये प्रत्यक्षात शाळा सुरु झाल्या नसल्या तरी शैक्षणिक वर्ष मात्र वेळेवर सुरु करण्याच्या दृष्टीने आॅनलाईन किंवा आॅफलाईन पद्धतीने शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नवी मुंबई शहरात खाजगी ३८३ आणि महानगरपालिकेच्या ७४ शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे२ लाख ६३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून आठ हजार ८३शिक्षक या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. शहरातील खाजगी आणि महापालिका शाळांमध्यविद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. शहरातील खाजगी शाळांचा अभ्यासक्रम आॅनलाईन अॅपच्या माध्यमातून सुरु झाला असून सीबीएसई शाळेतील विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन पद्धतीने चाचणी परीक्षा देखील सुरु झाल्या आहेत.
शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ई-लर्निंग साहित्याची आवश्यकता लक्षात घेऊन शिक्षकांच्या माध्यमातून इयत्तानिहाय व विषयनिहाय घटकांचे सूक्ष्म नियोजन करुन ई-लर्निंग साहित्य तयार करण्यात आले आहे. यामध्ये आॅडीओ, व्हिडिओ, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असे विविध प्रकारचे पूरक साहित्य तयार करण्यात आले आहे. त्यासोबतच विदयार्थ्यांची तयारी करून घेणे व मूल्यमापन करण्याकरिता स्वाध्याय, गृहपाठ, चाचणी यासारखे साहित्यही तयार करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र यू-टयुब चॅनेल तयार केले असून यावर शिक्षकांनी तयार केलेले आदर्श नमुना पाठ इयत्ता व विषयनिहाय प्रसिध्द करण्यात आले आहेत. विद्याथ्यांर्साठी आॅनलाईन पाठ्यपुस्तके देखील उपलब्ध करून दिली देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान टाळण्यासाठी डिजिटल शिक्षण पद्धतीला सुरुवात केली असली तरी महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांकडे डिजिटल शिक्षणासाठी लागणारे मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप, ईंटरनेट आदी साहित्य नसल्याने या विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी नवीन वर्षाच्या सुरु झालेल्या अभ्यासक्रमापासून वंचित आहेत.
नियमांचे उल्लंघन
डिजिटल पद्धतीने शिक्षण घेताना वेळेच्या मर्यादा लागू करण्यात आल्या आहेत. परंतु शहरातील खाजगी शाळांच्या माध्यमातून शासनाच्या नियमाचे उल्लंघन केले जात असून अतिरिक्त वेळ आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यास करण्याचा कंटाळा करीत असून त्यांच्या विविध शारीरिक व्याधी जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासन निर्देशानुसार महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण सुरु केले आहे. परंतु या शाळांमध्ये झोपडपट्टी भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेतात. या अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबात आॅनलाईन किंवा डिजिटल शिक्षणासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. शासन निर्णयानुसार महापालिकेने त्या सुविधा पुरविणे गरजेचे आहे परंतु प्रत्यक्षात या सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत.
- धनंजय खंडागळे, पालक